कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी मिलिंद कुलकर्णी यांची निवड


कल्याण : तब्बल १५७ वर्षे जुन्या असलेल्या कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी मिलिंद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.


सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत असलेले मिलिंद कुलकर्णी हे मागील ९ वर्षापासून कार्यरत होते. तसेच रोटरी क्लब ऑफ कल्याण या संस्थेचे अध्यक्ष होते. सद्यस्थितीत कुलकर्णी हे रोटरी क्लब या इंटरनॅशनल संस्थेच्या जिल्हा गव्हर्नर पदी विराजमान झाले असून अनेक सामाजिक क्षेत्रातही ते फार मोलाचे काम करीत आहेत.


सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर वाचनसंस्कृती वाढविण्याबाबत तसेच वाचकांच्या वाचनाची भूक भागविण्यासाठी शहरातील अनेक भागांमध्ये नवीन वाचनालय उभारण्याचा त्यांचा मानस आहे. मिलिंद कुलकर्णी यांची १५७ वर्षे जुन्या वाचनालयाच्या अध्यक्षपदावर निवड झाल्याबद्दल सर्व स्तरांवरून त्यांचे अभिनंदन होत आहे.


Post a Comment

0 Comments