दिनेश खरोटे यांची नियुक्ती


डोंबिवली ( शंकर जाधव ) गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशनच्या कोकण विभाग अध्यक्षपदी  दिनेश  खरोटे यांची नियुक्ती  करण्यात आली. खरोटे हे सुवर्णकार व्यवसायिक असून अनेक सामाजिक संस्थांवर विविध पदांवर कार्यरत आहेत.

         या संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम काळे, उपाध्यक्ष नचिकेत  भुर्के, संघटक भैय्या भाऊ भामरे  यांनी नियुक्तीपत्र दिले केले. सोने मूल्यांकन बद्दलच्या विविध समस्यांवर मात करण्यासाठी व्हॅल्यूअर्सनी या संघटनेमार्फत एकत्र येण्याची गरज असल्याचे नमुद केले.


        गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन ही खाजगी , शासकीय तसेच इतर वित्तसंस्थांमधील सुवर्ण मुल्यांकन करणार्‍या व्यावसायिकांची संघटना आहे.

Post a Comment

0 Comments