एसएसटी महाविद्यालयात जिल्हा स्तरीय पाच दिवसीय नागरी संरक्षण शिबीर


कल्याण : एसएसटी महाविद्यालयात जिल्हास्तरीय पाच दिवसीय नागरी संरक्षण प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून विजय जाधव (उपसंचालक,नागरी संरक्षण विभाग नवी मुंबई जिल्हा ठाणे)अतुल जगताप (सह उपसंचालक, नागरी संरक्षण विभाग नवी मुंबई जिल्हा ठाणे)डॉ. पुरस्वानी (चेअरमन आणि संस्थापक प्राचार्यएस. एस. टी. महाविद्यालय), प्रा.जीवन विचारे (एनएसएस ठाणे जिल्हा समन्वयक  व एस.एस.टी. महाविद्यालयाचे उपप्राचार्य) एनएनएसचे  विभागीय समन्वयक प्रा.निनाद कासले आणि  डॉ संजय जॉयभाय हे उपस्थित होते. शिबिरात अतुल जगताप यांनी प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळली. या शिबिरात ठाणे जिल्हयातील २२ महाविद्यालयामधून १३९ स्वंयसेवक सहभागी झाले होते.


या शिबीरात रा.से.यो.च्या स्वयंसेवकांना नागरी संरक्षण कायदाउद्दिष्टेकार्यपद्धतीयुद्धप्रसंगी स्वयंसेवकांची कर्तव्ये आणि कार्यबॉम्बचे प्रकाररेडिएशन त्याचे दुष्परिणाम याची माहिती व्याख्यांनांद्वारे अतुल जगताप यांनी दिली. तसेच या पाच दिवसीय कार्यशाळेत रा.से.यो.च्या स्वयंसेवकांना प्रथमोपचारबँडेज बांधणेस्टेचेर बनवणेदूरसंचार विविधप्रसंगी उपयोगात येणाऱ्या गाठीअग्नी शमन पद्धतीबिल्डिंगवरून खाली उतरणे इतर गोष्टींचे प्रशिक्षणही देण्यात आले.


हे प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्याकरिता एसएसटी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी योगेश पाटीलअंकित उपाध्यायअनिल तेलिंगेमयूर माथूर आणि संजय परटोले तसेच रमेश सरोजनिशांत मेश्रामनिकिता भोईर आणि इतर स्वयंसेवकांचे योगदान लाभले.

Post a Comment

0 Comments