एसएसटी कॉलेज मध्ये पॅरेनटाईन डे उत्साहात साजरा


कल्याण : १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. पण एसएसटी महाविद्यालयात दरवर्षी हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे म्हटलं कीयुवक युवती हा दिवस एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करत साजरा करत असतात. पण पाश्चिमात्य संस्कृतीला मागे टाकत आणि आपली भारतीय संस्कृती जपत व्हॅलेंटाईन डे ची व्याख्याच एसएसटी महाविद्यालयाने बदलली आहे.


        कॉलेजमध्ये हा दिवस पॅरेनटाईन डे म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाची सुरुवात एसएसटी महाविद्यालयाचे  अध्यक्ष आणि संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांनी दीप प्रज्वलन करुन केली. तसेच यावेळी आयक़्युएसी समन्वयक डॉ.खुशबू पुरस्वानी, एनएसएसचे जिल्हा समन्वयक प्रा.जीवन विचारे आणि महाविद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

  

       कार्यक्रमाच्या सुरुवातिला "बेटी बचाव बेटी पढाओ" या विषयावर सामाजिक संदेश देणारे नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या ड्रामानॉमिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी "आपने हमारे लिये किया ही क्या है" ही पालक आणि विद्यार्थ्यावर आधारित एक नाटीका सादर केली. त्यानंतर मुलांनी पालकांचे आई वडिलांचे पाय धुऊनऔक्षण केले आणि त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांना पेढा भरविला. त्याचबरोबर मुलांनी पालकांविषयी असलेलं प्रेम हे त्यांना मिठी मारून आणि नमस्कार करुन व्यक्त केलं. यावेळी मुलांनी कळत नकळत केलेल्या चूकांबद्दल मेडिटेशन करून पालकांकडे क्षमायाचना केली आणि पालकांनी त्यांना क्षमा केली.

      

         हा सोहळा पाहून उपस्थित सर्व पालक भावूक झाले आणि काहींना अश्रू अनावर झाले. काही पालकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना एस एस टी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी करत असलेल्या उपक्रमांचे कौतुक करत आभारही व्यक्त केले. पालकांवर असलेले प्रेम व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले. 


       कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. पुरस्वानी यांनी आलेल्या सर्व पालकांचे आभार मानत महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती देउन पालक आणि महाविद्यालय मिळून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शेवटी आभार प्रदर्शनानंतर पूवमामा हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली देण्यात आली. नंतर राष्ट्रगीत घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments