भिवंडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदाराला ६ लाखांची लाच घेताना अटक ..

  


भिवंडी दि 25 (आकाश गायकवाड  ) भिवंडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार असलेल्या एका लाचखोर अधिकाऱ्याला   ६ लाखांची लाच घेताना  मुंबई अँटी करप्शन पथकाने सापळा रचून रंगेहात अटक केली आहे.  विट्ठल रामभाऊ गोसावी असे लाच प्रकरणी रंगेहाथ अटक केलेल्या नायब तहसीलदाराच नाव आहे.  

 

■८ लाखांची केली होती मागणी. ..


        मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचे काम सुरु आहे. त्यासाठी रेल्वे लगतच्या शेत जमिनी शासनाला हस्तांतर करून त्याबद्दल मोबदला देण्यात येत आहे. अशाच एका शेतकऱ्याची रेल्वेच्या  तिसरा लोहमार्गात बाधित होणाऱ्या जमिनीसाठी एका खाजगी व्यक्तीकडून तक्रारदार यांना लाचखोर गोसावीने  बाधित जमिनीचा  मोबदला देण्यासाठी ८ लाखांची मागणी केली होती. मात्र त्यामध्ये तडजोड होऊन लाचेची रक्कम ६ लाख देणे ठरले होते. या दरम्यान  तक्रारदार यांनी मुंबई अँटी करप्शन विभागात नायब तहसीलदार गोसावी व एका खाजगी व्यक्ती विरोधात लेखी तक्रार दाखल केली होती.

 

■भिवंडी प्रांत कार्यालयात सापळा..


        त्या तक्रारीच्या अनुषंगाने  मुंबई  नायब तहसीलदार गोसावी  आज दुपारच्या सुमारास भिवंडी प्रांत कार्यालयात सापळा रचला असता  नायब तहसीलदार गोसावीला ६ लाखांची लाच घेताना रंगेहात ताब्यात घेतले असून त्यांच्यासह  एका खाजगी व्यक्तीला  ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. तर गोसावी राहत असलेल्या निवासस्थानीही एक पथक दाखल होऊन त्यांच्या घराची झाडाझडती घेत असल्याची माहिती समोर आली आहे. 


         तसेच प्रांत कार्यालयाच्या आवारात  लाचखोर गोसावी यांच्या  कारची तपासणी करून त्यामधील काही कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.    

Post a Comment

0 Comments