ठाणे (प्रतिनिधी) - गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर उपाध्यक्ष सोमा डे यांच्या वतीने सत्यवान पाटील यांच्या सहकार्याने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या हळदीकुंकूला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
ठाणे शहरातील घोडबंदर रोड या परिसरातील किंगकाँग नगरात हळदी कुंकूचे आयोजन करण्यात यावे, अशी विनंती स्थानिक महिलांनी सोमा डे यांना केली होती. त्यानुसार, सोमा डे यांनी ह्या सोहळ्याचे आयोजन केले होते. या हळदीकुंकू सोहळ्याला परिसरातील सुमारे 500 पेक्षा अधिक महिलांनी उपस्थिती दर्शविली.
या हळदीकुंकू समारंभास ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहर कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील , प्रदेश सचिव शशिकला पुजारी, विधानसभा अध्यक्ष कांता गजमल, ब्लॉक अध्यक्षा अनिता मोटे, ब्लॉक अध्यक्षा मनीषा पाटील, वॉर्ड अध्यक्षा रेणुका हळगूदे, ब्लॉक कार्याध्यक्षा अश्विनी मोरे, उषा प्रसाद आदी उपस्थित होत्या.
0 Comments