हम कूछ कम नही`.... आघाडीसाठी राष्ट्रवादी ताकद दाखवणार..डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर फक्त एकदा तेही अडीच वर्ष राष्ट्रवादीची सत्ता आली होती.त्यानंतर राष्ट्रवादीला १० जागांवरही विजय मिळवता आला नाही.एवढेच नव्हे तर २०१५ च्या निवडणुकीत फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले.राज्यात शिवसेना-भाजप युती तुटून शिवसेना–कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले.जिल्हा परिषद,ग्रामपंचायतिच्या निवडणुकीत या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपाला शह दिला.


      मुंबई आणि ठाणे महानगरपालिके नंतर कल्याण-डोंबिवलीमहानगरपालिकेची निवडणुकीचे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले असते.पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र येतील का यावर राजकीय चर्चा सुरु झाली आहे.मात्र `हम कूछ कम नही`असे वेळ आली तर राष्ट्र्वादिने स्वबळावर लढू असे अप्रत्यक्षपणे शिवसेनेला दाखवले आहे.


         गेल्या वर्षीपासून कल्याण-डोंबिवली व ग्रामीण भागात राष्ट्रवादीने जाहीर मेळावे, सभा, कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर सभा घेण्यास सुरुवात केली.कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी प्रदेश अध्यक्ष जयंता पाटील आणि  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सारखे मोठे नेतेममंडळीने कल्याण-डोंबिवलीतील आढावा बैठक घेतल्या.राजकारणातील खेळ जाणत असलेल्या व कार्यकर्त्यांच्या मानत असलेले डॉ. जगन्नाथ शिंदे यांना पक्षश्रेष्ठींनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली.


       कार्याध्यक्षांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मार्गदर्शनपर बैठका घेतल्या.राष्ट्रवादीची ताकद पाहता आगामी निवडणुकीत आमची ताकद कमी नाही असे दाखवण्याच्या प्रयत्न केल्याची दिसते.मात्र यापूर्वीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद पाहता यावेळी शिवसेना राष्ट्रवादीचा जागावाटपात किती विचार करतील याबाबतही स्थानिक पातळीवरील नेते मंडळीमध्ये अंतर्गत चर्चा सुरु आहे.


    २०१५ च्या निवडणुकीत शिवसेना ५२, भाजप ४३, मनसे १०, कॉंग्रेस ४, राष्ट्रवादी २ व एमआयएम २ असे संख्याबळ होते.यावरून शिवसेनेची ताकद केडीएमसीत वरच्या स्थानकावर आहे हे इतर पक्षांना नाकारता येणार  नाही.शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीचे संकेत दिले असून पालिकेच्या निवडणुकीत जागावाटपात शिवसेना ६०-४० का ७०-३० हा हौर्मुला वापरतील का ? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.यात कॉंग्रेसला सहभागी केल्यास राष्ट्रवाडीच्या वाट्याला जागा कमी मिळण्याची शक्यता आहे.


        तर शिवसेनेने स्वबळावर ८० जागा मिळवण्याचा राजकीत खेळ खेळला तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादी ३० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळेल असे वाटत नाही.मनसेचे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यानो  तर `एकला चलो रे` अशी भूमिका असल्याचे स्पष्ट केले.या भुमिकेने मनसेला १५ जागांवरहि समाधान आहे असे एकूण चित्र दिसते.इतर राजकीय पक्षांची ताकद तशी फारशी नसल्याने निवडणूकित या पक्षांचा प्रभाग दिसेल अशी येथील राजकीय परिस्थिती नाही.भाजपाने तर स्वबळावर लढवून आपली सत्ता आणू असे ठामपणे सांगत आहे.

   

      पक्षश्रेष्ठीं अंतिम निर्णय घेतली, तोपर्यत १३३ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयार असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिंदे यांनी रविवारी कल्याणात कार्यकारणी सभेत कार्यकर्त्याना मार्गद्र्ष्ण करताना सागितले. तर गुलाब वझे यांनी ग्रामीण भागात राष्ट्रवादीची पकड घट्ट होत असून निवडणुकीत याचा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला.

   

       राष्ट्रवादीला आपली ताकद वाढवण्यासाठी राज्यातील फोर्मुलानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेशी हातमिळवणी करताना झुकते माप घेण्यातच फायदा हे  वरिष्ठांना माहित असावे.राष्ट्रवादीत इनकमिंग होईल अशी चिन्हे सध्या तरी दिसत नसली तरी शिवसेनेनकडे आयारामांची संख्या वाढत आहे

Post a Comment

0 Comments