पहिली रिजेन्सी ट्रॉफी स्केटिंग स्पर्धा संपन्न



कल्याण :  स्केटिंग असोसिएशन कल्याण तालुका आणि रिजेन्सी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली रिजेन्सी ट्रॉफी स्पर्धा डोंबिवलीच्या अनांतम रेसिडेन्सी येते संपन्न झाली. या स्पर्धेत ठाणे, मुंबई पालघर रायगड येथील १८२ खेळाडू सहभागी होऊन स्पर्धाला चांगला प्रतिसाद दिला. ही स्पर्धा स्केटिंग च्या पाच विविध प्रकारांमध्ये खेळवण्यात आली.


 या स्पर्धेत मुंबईच्या टीम एक्स्ट्रीम या क्लबने विजेतेपद तर मीरा-भाईंदर चा स्केट लाइफ क्लबने उपविजेतेपद पटकावले तर एम. के क्लबला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील विजेत्या संघाला रीजन्सी ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेच्या अतिम पारितोषिक वितरण समारंभ साठी रिजेन्सी ग्रुपचे डायरेक्टर राहुल भाटिचा यांच्या हस्ते करण्यात आले.  तर या स्पर्धेसाठी रीजन्सी ग्रुपचे डायरेक्ट विकी रूपचंदानी यांचे सहकार्य लाभले.


       या स्पर्धेत कियांश अग्रवालतक्षी परदेशी, सात्विक मोरया, काशवी जोशी, रिनेश गुप्ता, केरा जगदाळे निव्ह कृष्णन, अनिरुद्ध बागरीमिहिका दास, दिवा मल्होत्रारुद्र पवार, संस्कृत यमगर आदी खेळाडू विजयी झाले. 

Post a Comment

0 Comments