गणाईचा अद्यतन महोत्सव जल्लोषात संपन्न


कल्याण : माणुसकीची मूल्य जपणाऱ्या गाण्यांनी सुरुवात करत गणाईच्या मुलांनी साकारलेले  एका मातृ भाषेचं मूळ असलेल्या झाडाच्या हातांमध्ये समतेचीमानवतेची पृथ्वी ठेवून जेष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी अद्यतन महोत्सवाचे उद्घाटन केले. अश्या आगळ्या वेगळ्या उदघाटना नंतर संजय आवटे यांचे "आजचा समाज आणि आपली जबाबदारी" या विषयावर अत्यंत प्रभावी असे व्याख्यान झाले. व्याख्यानानंतर हर्षद जाधव यांनी कार्यक्रमाची सूत्र घेत व्याख्याना वर प्रश्नोत्तराचे सत्र सांभाळले.


"स्वामी अमर जगदीश" यांनी प्रत्येकाच्या मनाला एकरूप करत ध्यान घेतले  त्या ध्यानात सगळे सहभागी होऊन ध्यानमग्न झाले. गणाई अद्यतन महोत्सवाच्यानिमित्ताने गणाई च्या विचारांवर आधुनिक समाजाची उभारणी करणाऱ्या नवं नेतृत्वाना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये "गणाई गौरव पुरस्कार -  जितेश पाटील,  "ग्राम गौरव पुरस्कार- युवराज तोरावणे, विद्यार्थी भूषण पुरस्कार - सलोनी तोडकरी, कला गौरव पुरस्कार- राहुल साळवे, समाज गौरव पुरस्कार -योगिनी खानविलकर, आरोग्य गौरव पुरस्कार - संतोष आंधळे, संघर्ष गौरव पुरस्कार - शकील अहमद आदींचा समावेश होता.


गणाई ही एक अशी  समाज व चळवळ आहे जी संस्कृतीचे जतन करता करता आधुनिक मूल्यांवर विज्ञानाच्या तत्वावर आधारित एक नवीन समाज उभारणी कडे वाटचाल करते. वस्ती  वस्तीत खेड्यापाड्यातगावागावात "गण" ही संकल्पना पोचवण्यासाठी कार्यरत आहे. माणुसकी पेरणारी चळवळ तरुणाईमध्ये वृधीगत व्हावी अशी माहिती गणाई चळवळ अध्यक्ष श्रेया निकाळजे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments