क्रेड्युस - एचसीपीएलला जलविद्युत कार्बन क्रेडिट्स प्रकल्प मिळाला


मुंबई, २७ फेब्रुवारी २०२२ : क्रेड्युस टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड-एचसीपीएल जेव्हीने, भारतातील सर्वांत मोठ्या सिंगल जलविद्युत कार्बन क्रेडिट्स प्रकल्पासाठी सतलज जल विद्युत निगम लिमिटेडने मागवलेली बोली जिंकल्याची घोषणा केली आहे. 


       या प्रकल्पातील उपक्रमांची परिणती सतलज जल विद्युत निगमच्या हंगामी (व्हिंटेज) प्रकल्पातून ८० दशलक्षांहून अधिक कार्बन क्रेडिट्सच्या निर्मितीमध्ये होणार आहे आणि कार्बन क्रेडिट्सच्या दावे व व्यापारासाठीचा हा देशातील सर्वांत मोठा खासगी-सार्वजनिक सहयोग ठरणार आहे. कार्बन क्रेडिट प्रकल्पातील उपक्रम एसजेव्हीएनला सुमारे १०० दशलक्ष डॉलर्स इतके उत्पन्न मिळवून देण्याच्या स्थितीत आहेत. 


        एसजेव्हीएनने कार्बन क्रेडिट्स उपलब्ध करून घेण्यासाठी पात्र सेवा पुरवठादारांकडून बोली मागवल्या होत्या. या कठोर निविदा प्रक्रियेमध्ये क्रेड्युस-एचपीसीएल जेव्ही ही कंपनी विजेती ठरली. पॅरिस हवामान करारातून आलेल्या नवीन नियमांशी जोडून घेण्याचे उद्दिष्टही एसजेव्हीएन व क्रेड्युस यांनी ठेवले आहे.


    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीओपी२६ शिखर परिषदेदरम्यान, भारत २०७० पर्यंत शून्य उत्सर्जन साध्य करेल असे उद्दिष्ट जाहीर केले आहे. ही घोषणा म्हणजे या उद्दिष्टाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.


       क्रेड्युसचे संस्थापक शैलेंद्रसिंग राव म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी सीओपी२६ मध्ये केलेल्या घोषणांशी सुसंगती राखत, क्रेड्युसने सर्व पर्यावरणपूरक प्रकल्पांना कार्बन क्रेडिट्सवर दावा करण्यासाठी व ते उपयोगात आणण्यासाठी घालून दिलेल्या ऐच्छिक बंधनांची तसेच नियमांची पूर्तता करून, निर्मिती व सेवेचा, महत्त्वाकांक्षी प्रवास सुरू केला आहे. या कराराचा भाग होणे आमच्यासाठी सन्मानाचे आहे. येत्या दशकांत, आम्ही एसजेव्हीएनला लक्षावधी कार्बन क्रेडिट्सचा दावा करण्यामध्ये तसेच त्यानंतर उत्पन्न मिळवण्यामध्ये मदत करू.”


    एसजेव्हीएनच्या हंगामी तसेच भविष्यकाळातील निर्मितीमध्ये, ताळेबंद भक्कम करण्यात तसेच अशा प्रकारचे अन्य काही प्रकल्प हिमाचल प्रदेश व देशाच्या अन्य काही भागांत राबवण्यात, या आकड्यांमुळे, नक्कीच मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments