हिजाबच्या समर्थनार्थ कल्याण मध्ये महीला कॉंग्रेसची निदर्शने


कल्याण : कर्नाटकात हिजाबवरुन सुरु असलेल्या वादंग देशभरात पसरला आहे. अनेक ठिकाणी हिजाबच्या समर्थनात आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. या पाश्र्वभूमीवर कल्याणमध्ये काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेत्तृत्वाखाली काँग्रेसच्या महिला आघाडीकडून हिजाबच्या समर्थनासाठी छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. 


           तर हिजाबसाठी राजकीय पक्ष राजकारण करीत असल्याचा आरोप करीत काही महिलांनी वाद घातला. यावेळी महिलांच्या दोन गटात झटापट झाली. हे आंदोलन उधळून लावण्यासाठी काही महिला पाठविण्यात आल्याचा आरोप काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी केला आहे.


हिजाबच्या समर्थनार्थ कल्याण मध्ये आंदोलन सुरु असतांना एका महिलेने काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसोबत वाद घातला. हिजाब आमचा हक्क आहे. तो हिरावून घेऊन शकत नाही. मात्र काँग्रेस राजकारण करीत असल्याचा आरोप या महिलेने केला.  त्यानंतर येथील काँग्रेस कार्यकर्त्या आणि या महिलेसोबत असलेल्या काही महिलांमध्ये जोरदार झटापट झाली. मात्र यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. काही महिलांचा विरेाध पाहता काँग्रेस कसेबसे हे आंदोलन उरकले. 


दरम्यान आमचे आंदोलन शांत पद्धतीने सुरु होते. आमचे आंदोलन उळून लावण्यासाठी महिला पाठविण्यात आल्या. या महिलांना कोणी पाठविले हे आम्हाला माहिती नाही. याची आम्ही पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments