नवाब मलिकांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीची भाजपा विरोधात निदर्शने


कल्याण : महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. पनवेलच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या वतीने नवाब मलिक  यांच्या समर्थनार्थ भजापा सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. 


        भारतीय जनता पार्टी आपल्या केंद्रातील  सत्तेचा दुरुपयोग करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना ईडीच्या माध्यमातून नाहक त्रास देत आहे.  महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहत असून ही जनताच भाजपाला धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली. 


       यावेळी सुदाम पाटील, बबन पाटील, आर.सी. घरत, शिवदास कांबळे, संदीप म्हात्रे, आर. एन. यादव, नेटके, अनिल निके, जितेंद्र यादव, दिनेश यादव, सुरेश राजवन, योगेश निपाने आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments