आमदार गणपत गायकवाड यांच्या निधीतून विकास कामांचा शुभारंभ

■माणेरे वसारचिंचपाडा नांदिवली प्रभागातील अनेक कामे लागणार मार्गी...


कल्याण : आमदार गणपत गायकवाड यांच्या निधीतून विकासकामांचा शुभारंभ झाला असून  कल्याण पूर्व मतदार संघातील माणेरे वसारचिंचपाडा नांदिवली प्रभागातील अनेक कामे लागणार मार्गी लागणार आहेत.


       २७ गावांचा महानगरपालिकेत समावेश होऊन सुद्धा विकास झालेला नाही. पालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे २७ गावात सेवा सुविधा देण्यास महापालिका अपयशी ठरत आहे. यामुळे नागरिकांची गरज लक्षात घेता कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून विशेष निधीतून कल्याण पूर्व मतदार संघातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला असून या निधीतून विविध विकासकामे करण्यात येत आहेत.


       शुक्रवारी कल्याणपूर्वेतील प्रभाग क्र.११९ माणेरे वसार प्रभागातील आमदारांच्या प्रयत्नाने व राज्य शासनाच्या विशेष विकास निधी तसेच आमदारनिधी मधून  माणेरे वसार गावठाण परिसरात पायवाट व गटार तयार करणेवसार गांवाअंतर्गत गटार व पायवाटा व सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करणेगायकर नगर परिसरात गटार पायवाट व सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करणे. 


        प्रभाग क्र.१०६ चिंचपाडा नांदिवली तर्फे अंबरनाथ प्रभागातील नांदिवली येथील गजानन कृपा सोसायटी नं.३ परिसरात गटार व पायवाटा तयार करणे, नांदिवली परिसरातील अदिती प्लाझा, साई दिगंबर सोसायटी परिसरात गटार पायवाटा तयार करणे. नांदिवली येथील गावदेवी मंदिर ते जय बजरंग व्यायाम शाळेपर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.


या कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरीक व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून पार पडला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


तर महापलिकेत असून देखील गेल्या अनेक वर्षांपासून २७ गावातील नागरिकांची अनेक विकासकामे प्रलंबित असून नागरिकांची गरज लक्षात घेता याबाबत आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करून नांदिवलीतील विविध विकासकामे मार्गी लावली असून आमदारांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नांदिवली मधील सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद ढोणे यांनी आमदारांचे आभार मानले आहेत. 

Post a Comment

0 Comments