आय फायनान्सचा महाराष्ट्रात विस्तार


मुंबई, ११ फेब्रुवारी २०२२ : व्यापक विकास करण्याच्या उद्देशाने आय फायनान्स ही भारतातील वंचित एमएसएमई विभागाला कर्जसुविधा देणारी कंपनी ठाणे, पनवेल, जालना, शिरपूर यांसह इतर ठिकाणी १० नवीन शाखांचे उद्घाटन करत महाराष्‍ट्रातील आपली उपस्थिती वाढवत आहे. नवीन विकास आयची भौगोलिक उपस्थिती अधिक दृढ करतो, ज्यामुळे त्यांच्या शाखा महाराष्ट्रामध्ये २३ पर्यंत, तर भारतभरात ३११ पर्यंत वाढल्या आहेत.


     भारतातील सूक्ष्म व लघु उद्योग वित्तपुरवठ्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीकोनासह स्थापना करण्यात आलेल्या आय फायनान्सने नोव्हेंबर २०२१मध्ये द्वितीय श्रेणी व त्यापुढील श्रेणीच्या शहरांमधील १,००० हून अधिक कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे, ज्यामुळे त्यांची एकूण कर्मचारी संख्या ४,६०० पर्यंत पोहोचली आहे. आयने चालू आर्थिक वर्षामध्ये १०० नवीन केंद्रांचे उद्घाटन जलद विस्तारीकरण साधले आहे. २० राज्यांमध्ये त्यांची ३११ केंद्रे आहेत.


     आय ही एकमेव मापनीय, भारतभरात उपस्थित असलेली कंपनी आहे, जी मोठ्या प्रमाणात कर्जसुविधांपासून वंचित सूक्ष्म-उद्योग विभागाला असुरक्षित लघु आकाराचे व्‍यवसाय कर्ज देते. आयने कर्ज देण्यास अवघड असलेल्या या विभागाला अद्वितीय क्लस्टर-आधारित क्रेडिट मूल्यांकन दृष्टीकोन व सानुकूलरित्या डिजिटाईज केलेल्या फिजिटल मॉडेलसह साह्य केले आहे.


     आय फायनान्सचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी समिर मेहता म्हणाले, "भारतातील एमएसएमई हे अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत. पण त्यांना सतत कर्जसुविधा उपलब्ध होण्याची गरज आहे आणि दुर्दैवाने ते आर्थिक सेवांच्या बाबतीत वंचित आहेत. आम्‍ही २०१९ पासून महाराष्ट्रातील तळागाळामधील व्यवसायांना क्रेडिट गरजांसह सेवा देत आलो आहोत. नवीन शहरांमधील या विस्तारीकरणासह आम्ही अशा अधिकाधिक व्यवसायांना संघटित कर्जसुविधा देऊ, ज्यामुळे देशव्यापी आर्थिक समावेशनाचे आमचे ध्येय पूर्ण होण्यास मदत होईल."

 

        आय फायनान्स आपली ना-नफा तत्त्वावर असलेली शाखा एफएएमईच्या (फाऊंडेशन फॉर अॅडवान्समेंट ऑफ मायक्रो एंटरप्राईज) माध्यमातून सूक्ष्म उद्योगांना 'बीयॉण्ड फायनान्सिंग' सपोर्ट देखील देते आणि आधुनिक भारताप्रती त्यांच्या प्रवासामध्ये प्रबळ भागीदार बनली आहे.

Post a Comment

0 Comments