ठाणे रेल्वे स्थानकातील कोपरी पुर्व येथील सॅटीस-२ डेक उन्नत मार्गाच्या भागाचे भूमिपूजन...मा. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते...


ठाणे, प्रतिनिधी  : - आज ठाणे रेल्वे स्थानकातील कोपरी पूर्व येथे रेल्वे हद्दीतील सुरु होणाऱ्या बांधकाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 


         त्यावेळी खासदार राजन विचारे, महापौर नरेश म्हस्के, उप महापौर सौ. पल्लवी पवन कदम, आयुक्त डॉ. विपिन कुमार शर्मा, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, संजय हेरवाडे, स्थानिक नगरसेविका मालती रमाकांत पाटील, नम्रता हेमंत पमनानी, शर्मिला रोहित गायकवाड, नगरसेवक भरत चव्हाण, संजय वाघुले, माजी नगरसेवक गिरीश राजे, सर्व शिवसेना पदाधिकारी व महापालिकेचे सहाय्यक आयुक्त व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


        या प्रकल्पास खासदार राजन विचारे यांनी सन २०१८ साली मंजुरी मिळवून घेतल्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत घेतलेल्या प्रकल्पांचा समावेश करून केंद्र सरकारच्या आय आर एस डी सी विभागाकडून मंजुरी मिळवून २०१९ ला या कामाला सुरुवात केली. कोरोना महामारीत या कामाचा वेग मंदावला होता.


           त्याला गती देण्यासाठी खासदार विचारे यांनी या प्रकल्पाची ठाण्याचे महापौर नरेशजी म्हस्के यांच्या समवेत पाहणी करून या प्रकल्पातील अडथळा दूर करून या कामाला गती दिली. या संपूर्ण प्रकल्पाच्या महानगरपालिका हद्दीतील ५०% काम आत्ता पूर्ण झालेले आहे.


       आजच्या भूमिपुजना नंतर रेल्वे हद्दीतील एक बेसमेंट लेव्हल, तळमजला, मिड डेक लेव्हल व डेक लेव्हलचे बांधकाम होणार आहे. रेल्वेच्या वाणिज्यिक उपयोगाकरिता ८ मजली इमारतीच्या बांधकामास सुरुवात होणार आहे.


त्यामध्ये खालील बाबींचा समावेश असणार आहे.


1.     बेसमेंट लेव्हल या प्रकल्पाअंतर्गत बेसमेंट लेव्हलला रेल्वे स्थानकालगत वाहनतळ सुविधा उपलब्ध होणार आहे. सदर बेसमेंट मध्ये २०० चारचाकी वाहने (LMV) व १२५ दुचाकी वाहनांच्या पार्किंग क्षमतेची सुविधा असणार आहे.


2.     तळमजला येथे रेल्वे तिकीट बुकिंग कार्यालय, प्रवेशव्दार आत व बाहेर, पादचारी प्रवाश्यांकरिता प्रवासी थांबे मार्गिका (Pick & Drop Lance Facility) व प्रतिक्षा क्षेत्राचा समावेश आहे.


3.     मिड डेक फ्लोअर लेव्हल :- मिड डेक फ्लोवर लेव्हल येथे प्रवाशाकरिता सीट आऊट स्पेस प्रतिक्षालय (डॉरमेट्री), सी.सी.टि.व्ही. व आरामकक्ष या सुविधांचा समावेश आहे.


4.     डेक लेव्हल :- डेक लेव्हल या स्तरावर सार्वजनिक बस टर्मिनलचा समावेश असणार आहे. ज्यामध्ये १२ बस थांबे असणार आहे. तसेच यामजल्यावर प्रवाशांकरिता तिकीट बुकिंग कार्यालय व प्रतिक्षा क्षेत्र (Waiting area) यांचा देखील समावेश करण्यात येणार आहे.


           या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च रु.२६० करोड आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ठाणे महानगरपालिका हा खर्च उचलणार आहे.


चौकट -

         ठाणे रेल्वे स्थानक (पुर्व) कडील बाजुस २.४० कि.मी. लांबीच्या मार्गिकेचे बांधकाम करणे तसेच ८००० स्के.मी. क्षेत्राच्या उन्नत बस डेकचे बांधकाम ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडमार्फत करण्यात येत आहे. सदर उन्नत बस डेकच्या वरील भविष्यात रेल्वे विभाग १६००० चौ.मी. क्षेत्रफळाचे व्यावसायिक बांधकाम करणार आहे. या प्रकल्पाचे कामी भारतीय रेल्वे स्थानके विकास महामंडळ मर्यादित यांचेकडून 'प्राधिकरण अभियंता मार्फत सदर प्रकल्पाची देखरेख करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments