दासनवमी निमित्त संगीत कट्ट्यावर संत रामदासांच्या नामाचा गजर :

"गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।


          गमूं पंथ आनंत या राघवाचा॥म्हणजेच ,"गणेश, जो सर्व गुणांचा ईश आहे, जो सर्व निर्गुणाचा मूळ आरंभ आहे त्याला आणि   देवी सरस्वती, जी चारही वाणींची मूळ आहे". समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते.


          समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला असे मानले जाते तरीही आज दासनवमी निमित्ताने संत रामदास ह्यांचे पाहिले श्लोक आणि अर्थ तरुण पिढीला प्रेरित करून अभिनय कट्ट्या अंतर्गत सुरू झालेल्या संगीत कट्ट्यावरील  गायकांनी समर्थ रामदास ह्यांना मानवंदना दिली.


ठाणे। शुक्रवार दि. २५ :  फेब्रुवारी रोजी सायं ५ वाजता  संगीत कट्ट्यावरील कार्यक्रमाला सुरुवात झाली . नवीन सुराला वाव देणाऱ्या संगीत कट्ट्याने नेहमीच भाग घेणाऱ्यांना गायकांना पुढे जाण्यास साथ दिली. मराठी गाण्यांना प्रोत्साहन देऊन मराठी गाण्यांची मैफील रंगवण्यासाठी ठाणे शहरातून वेगवेगळ्या भागातील गायकांनी सहभाग घेतला. 'शोधिसी मानवा' ह्या गाण्यांने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. 


          त्यानंतर 'या जन्मावर ' , 'पाहिले ना मी तुला ' , 'अश्विनी येना सुरतेच छेडीता' , ' एक धागा सुखाचा' , 'मळ्याच्या मळ्यामध्ये' , 'अरे मन मोहना', ' जिवंत ही गाडी' , 'साईबाबा आला' , 'कानडा-राजा-पंढरीचा', 'प्रभू तू दयाळू ' या गाण्यांचे सादरीकरण ,भारती बच्छाव, चंद्रशेखर शिंदे ,जगन्नाथ केदार, किशोर ठक्कर ,मनाली चेवळे, मीनाक्षी शिंदे ,प्रकाश मोरजे प्रेम सुर्वे ,राजेश तावडे, रवी पाटील, संदीप गुप्ता , हरीश आणि संगीता कनोजिया ,सुरेश गवळनी, विद्याधर ,यशवंत काळेकर इत्यादी गायकांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ते कार्यक्रम संपन्न होई पर्यंत प्रेक्षकांनी दिलेले प्रोत्साहन एक नवीन दिशा दाखवणारे होते.

         

         संगीत कट्टा नेहमीच नवीन गायकांसाठी सर्वोत्तम व्यासपीठ असून असाच लोकांनी सहभाग घ्यावा.असे किरण नाकतींनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासू फणसे ह्यांनी केले.

Post a Comment

0 Comments