संत रवीदास महाराज व संत सेवालाल महाराज यांची संयुक्त जयंती महोत्सव


डोंबिवली ( शंकर जाधव )  वंचित बहुजन आघाडी डोंबिवली पूर्व शहरावतीने संत रवीदास महाराज व संत सेवालाल महाराज यांची संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी वंचित बहुजन पार्टीचे डोंबिवली पूर्व अध्यक्ष सुरेंद्र ठोके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच शिक्षण युवा जनाधिकार संघटनेचे चेतन  सावरटकर यांनी आरटीआय योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कश्याप्रकारे शाळा- महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो याबाबत मार्गदर्शन केले.


          संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वानखेडे यांनी' ऐसा चाहूँ राज मैं.' या विषयावर भाषण केले.अर्चना कुमावत,अनिता देशमुख, प्रदीप बार्जे आणि श्रीप्रसाद खुळे यांनी वैज्ञानिक चमत्कार व गीत-गाण्यांसह प्रबोधनाचा कार्यक्रम सादर केला. 


          यावेळी रेखा कुरवारे, राहुल जाधव अध्यक्ष, गौतम गवई, अस्मिता सरवदे, रविकिरण मस्के, गौतम सुतार, दिनेश हिवराळे,  प्रतीक साबळे हे प्रमुख उपस्थिती होते. कार्यक्रमाचे निमंत्रक बाजीराव माने, अर्जुन केदार, मिलिंद साळवे, आशा ठोके, वैषाली कांबळे, निलेश कांबळे, तेजस कांबळे,संतोष पवार, राज सोनोने, समीर मोरे,रवी इंगोले होते. प्रमुख पाहुण्यांना वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले.तर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी दिपक भालेराव यांनी सांभाळली.

Post a Comment

1 Comments

  1. समाजामध्ये या प्रकारे उपक्रम राबवले पाहिजेत

    ReplyDelete