भिवंडी पालिकेत संत रविदास जयंती साजरी


भिवंडी : दि.17(प्रतिनिधी ) चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 645 वी जयंती संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी होत असताना भिवंडी महानगरपालिका मुख्यालय कार्यालयात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


           याप्रसंगी पालिका उपायुक्त मुख्यालय दीपक पुजारी, उपायुक्त दीपक झिंजाड,जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी गोकुळ कदम, राजू नरसाळे,शिवसेना शहर सचिव महेंद्र कुंभार, पत्रकार संजयभोईर ,मोनेश गायकवाड, रूक्मिणी वाघमारे,रत्नप्रभा कांबळे यांसह  पालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


          संत रोहिदास महाराज यांच्या समानतेच्या शिकवणीचा सर्वांनी अंगीकार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे यांनी याप्रसंगी  केले.

Post a Comment

0 Comments