ऑडी इंडियाला २०२२ मध्ये दोन - अंकी विक्री वाढीची अपेक्षा


मुंबई, २१ फेब्रुवारी २०२२ : वर्ष २०२१ यशस्वी ठरल्यानंतर ऑडी इंडियाचे विद्यमान मॉडेल्ससाठी प्रबळ ऑर्डर बुकिंग, तसेच यंदाच्या वर्षात लाँच करण्यात येणा-या नवीन मॉडेल्सच्या आधारावर वर्ष २०२२ मध्ये दोन-अंकी वाढीचे लक्ष्य आहे. जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने जागतिक पातळीवर सेमी-कंडक्टरचा तुटवडा आणि घातक कोविडच्या दुस-या लाटेचा प्रादुर्भाव असताना देखील वर्ष २०२१ मध्ये विक्रीत १०१ टक्के वाढीची नोंद केली.


       ब्रॅण्डसाठी २०२२ ची सुरूवात सकारात्मक उत्साहासह झाली, जेथे ३ फेब्रुवारी २०२२ रोजी स्थानिक पातळीवर उत्पादित करण्यात आलेली ऑडी क्यू७ लाँच करण्यात आली. ऑडी क्यू७ ब्रॅण्ड भारतामध्ये विक्री करणारे इतर क्यू मॉडेल्स जसे ऑडी क्यू२, स्थानिक पातळीवर उत्पादित करण्यात आलेली ऑडी क्यू५, ऑडी क्यू८ यांसह ऑडी क्यू-रेंजच्या (एसयूव्‍ही) केंद्रस्थानी आहे. ऑडीच्या क्यू रेंजचा भारतातील एकूण विक्रीमध्ये जवळपास ४५ टक्के हिस्सा आहे.


       ब्रॅण्ड्स सध्या भारतात विक्री करत असलेल्या ए-रेंजमध्ये (सेदान्स) स्थानिक पातळीवर उत्पादित करण्यात आलेल्या ए४ व ए५ आणि रेंजमधील अग्रस्थानी आयातित ऑडी ए८ एल यांचा समावेश आहे. ऑडी इंडिया परफॉर्मन्स कार्ससह (आरएस मॉडेल्स) ऑडी आरएस क्यू८, ऑडी आरएस ७, ऑडी आरएस५ स्पोर्टबॅक आणि ऑडी एस५ स्पोर्टबॅक यांची देखील विक्री करते.


         याव्यतिरिक्त ऑडी इंडिया देशामध्ये ५ इलेक्ट्रिक कार्सची विक्री करते, ज्यामुळे ऑडी भारतामध्ये इलेक्ट्रिक कार्सची व्यापक श्रेणी असलेला ब्रॅण्ड आहे. कंपनीला ग्राहकांकडून अद्भुत प्रतिसाद मिळाला आणि कंपनीचे २०२५ पर्यंत ईव्हींमधून एकूण विक्रीच्या १५ टक्के विक्री संपादित करण्याचे लक्ष्य आहे.


       २०२२ साठी ऑडी इंडियाला दोन-अंकी विक्री वाढ होण्याचा विश्वास आहे. ब्रॅण्ड यंदा व्यापक व सर्वोत्तम मॉडेल्स लाँच करणार आहे, ज्यामधून ग्राहकांना निवड करण्यासाठी कार्सची व्यापक श्रेणी उपलब्ध होण्याची खात्री मिळेल. ऑडी इंडिया स्थिर व लाभदायी व्यवसाय म्हणून उदयास येण्याच्या तिच्या ध्येयाच्या जवळ देखील पोहोचली आहे. प्रत्येक कार्यसंचालनामध्ये ग्राहकांना प्राधान्य देत ऑडी इंडिया स्ट्रॅटेजी २०२५ वरील त्यांचा प्रबळ फोकस कायम ठेवेल.

Post a Comment

0 Comments