भिवंडीत महापलिकेतील मूकबधिर सफाई कामगाराला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल..


भिवंडी  दि. १२ (प्रतिनिधी ) भिवंडी महापालिकेच्या सफाई कामगाराला मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या घटनेचा निषेध नोंदवत महापालिका कर्मचाऱ्यांनी मुख्यालय प्रवेशद्वारावर आंदोलन जरते आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्याची मागणी केली होती.

  
            आरोपीवर गुन्हा दाखल केला नाही तर सोमवार पासून कर्मचारी काम बंद आंदोलन करतील असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला होता. अखेर कामगाराला मारहाण करणाऱ्यांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कालमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


       युनिस रसीद खान (रा. गुलजारनगर ) असे कामगाराला मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सफाई कामगार किशोर पाटील हे त्यांच्या सहकारी कर्मचाऱयांबरोबर सफाईचे काम करत होते. त्यावेळी रस्त्यावरील धुळ उडत असल्याचे कारणामुळे युनिस खान याने कर्मचारी किशोर पाटील यांना धक्का बुक्की करून ठोश्या बुक्यांनी मारहाण केली होती.         या मारहाण प्रकरणी मनपा महिला कर्मचारी तारा अरुण घाडगे यांच्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी युनिस हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

Post a Comment

0 Comments