आल्या रे आल्या निवडणुका आल्या...कल्याण – डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले कॉंग्रेस - भाजपा कार्यकर्ते आमने - सामने


डोंबिवली ( शंकर जाधव ) सत्ता स्थापनेनंतर सुरुवातीला राजकीय पक्षांमध्ये एकमेकांवर टीका करण्यास रस नसतो.मात्र निवडणुकीचे बिगुल वाजले कि आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडतात.२०२० ते २०२२ या दोन वर्षात करोनाचे संकट आल्याने राजकीय पक्षांनी जनसेवा करण्यात पुढाकर घेतला. आता पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्षांनी आरोपांवर लक्ष केंद्रित केले आहे. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका केल्याने कॉंग्रेसने भाजपला उत्तर देण्याचे ठरविले.


       डोंबिवलीत अचानक बुधवारी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर निदर्शने करण्याचे ठरविले.हि माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते कार्यालयासमोर जमा झाले.दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या पक्षाविरोधात घोषणाबाजी केल्या.पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थितीत नियंत्रणात आली.या घटनेने कल्याण – डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले असल्याचे दिसते. `आल्या रे आल्या निवडणुका आल्या`अश्या चर्चा शहरात सुरू झाल्या आहेत.  

 

        कल्याण डोंबिवली जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कॉंग्रेसने मोदि सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी बुधवारी डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौकाजवळील भाजप कार्यालयासमोर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा झाले.मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी ककरण्यास सुरुवात केल्यावर याची माहिती भाजप कार्यकर्त्यांना समजली.तत्काळ भाजप कार्यकर्ते कार्यालयासमोर जमा झाले.कॉंग्रेस कार्यकर्ते व भाजपा कार्यकर्ते एकमेकांसमोर घोषणाबाजी करत असल्याने हे दुश्य पाहण्यासाठी गर्दी केली होती. 


       याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेतली. कार्यकर्त्यांनी त्याच्या पक्षांचे झेंडे फडकवून घोषणाबाजी करत असताना पाहून पोलिसांनी मध्यस्थी करून कॉंग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.कॉंग्रेस कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यावरही भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर पक्षांचा झेंडा फडकवणे थांबविले नाही.

 


चौकट

 भाजपानेच देशात करोना पसरविल्याचा कॉंग्रेसचा आरोप

 

     देशाचे पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची गुजरातमध्ये जाहीर सभा घेतली होती. यासभेत इतर देशातून लाखो लोक आले होते.म्हणूनच देशात करोना पसरला होता. उत्तर प्रदेशात निवडणुका असल्याने  निवडणुकीत मुद्दा हवा असल्याने येथील उत्तर भारतीयांचे जनतेमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. संयुक्त महाराष्ट्र लढया पासून आतापर्यत गुजरात हे राज्य महाराष्ट्राच्या नेहमीचा विरोधात राहिले आहेत. अश्या भाजपाचा आम्ही निषेध करण्यासाठी भाजप कार्यालयासमोर जमा झालो होतो.


-----------------------------------------------------------------

  सत्तेत नसल्याने कॉंग्रेस बावचळल्याचा भाजपा आरोप

देशाचे पंतप्रधान मोदी यांचे  नेतृत्व व काम जनतेला माहित आहे.सत्तेत नसल्याने कॉंग्रेस हे बावचळले आहेत.भाजप कार्यालयासमोर कॉंग्रेस निदर्शने करत असल्याचे माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते जमा झाले.आम्ही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना कार्यालयासमोर येऊहि दिले नाही.भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता जश्याच तसे उत्तर देण्यास सक्षम आहेत.

Post a Comment

0 Comments