५६ वर्षीय शेतक-यावर यशस्वी हदय शस्त्रक्रिया कल्याण मधील सिध्दीविनायक हॉस्पिटलच्या डाँक्टरांमुळे मिळाले नवजीवन


कल्याण  : ५६ वर्षीय शेतक-यावर यशस्वी हदय शस्त्रक्रिया करण्यात आली असून कल्याणमधील सिध्दीविनायक हॉस्पिटलच्या डाँक्टरांच्या प्रयत्नामुळे या व्यक्तीला नवजीवन मिळाले आहे. सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड कार्डियाक केअर सेंटरकल्याण येथील डॉक्टरांच्या टिमने ५६  वर्षीय व्यक्तीवर यशस्वीरित्या बायपास शस्त्रक्रिया करुन त्यांचे प्राण वाचविले. 


        ट्रिपल वेसल डिसीज (टीव्हीडी) मुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या या रुग्णावर ओपन हार्ट शस्त्रक्रिया केली. छातीत दुखणे (एनजाइना)धडधडणे आणि छाती जड होणे यासारख्या तक्रारींने ग्रस्त असणा-या रूग्णास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


कल्याण येथे राहणारे ५६ वर्षीय  दिनकर पाटील हे एक शेतकरी आहेत.  अचानक उद्भवलेल्या शारीरीक व्याधीने त्यांना दैनंदिन कामात अडचणी येऊ लागल्या. त्यांनी आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय देखील करून पाहिले. मात्र काहीही फरक पडला नाहीगेले चार दिवस ते हा त्रास सहन करत होते. त्यामुळेत्यांना चिंता वाटू लागली. छातीत दुखणेधडधडणे आणि छाती जड होणे यासारख्या चिंताजनक लक्षणांचा अनुभव आल्याने त्यांचे कुटुंबिय अस्वस्थ झाले. त्यांनी कल्याणमधील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि कार्डियाक केअर सेंटरमध्ये धाव घेतली.


रुग्णाला छातीत दुखणेधडधडणे आणि छातीत जड होणे यासारख्या तक्रारींसह रूग्णालयात घेऊन आले होते. सर्वात आधी त्यांचा ईसीजी  करण्यात आला ज्यामध्ये ह्दयाच्या स्नायूंचा दाह दिसून आला. डॉ. सचिन चौधरीइंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट यांनी त्वरीत कॅथ लॅबमध्ये नेलेत्यांनी अँजिओग्राफी करण्यात आली आणि त्यात रुग्णाला ट्रिपल वेसल डिसीज हा कोरोनरी आर्टरी डिसीज असल्याचे दिसून आले. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये यामुळे आणखी गुंतागुंत वाढू शकते आणि मृत्यू देखील ओढावतो. 


प्लाक तयार झाल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात,  हृदयाला रक्त प्रवाहात अडथळे येऊ शकतात. अखेरीसरक्त प्रवाह कमी झाल्यामुळे छातीत दुखणे,  श्वासोच्छवासाचा त्रास आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. याबाबत रुग्ण आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन करण्यात आले आणि रुग्णावर कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट करण्याचे ठरविले असल्याची माहिती डॉ. अभय जैन यांनी दिली.


ही प्रक्रिया हृदयाला रक्त प्रवाह आणि ऑक्सिजन पुरवठा सुधारते आणि छातीत दुखणे आणि श्वास लागणे यासारखी लक्षणे व्यवस्थापित करते. छातीची चीर बंद करण्यात करुन द्रव काढून टाकण्यासाठी छातीची नळी वापरण्यात आली. शस्त्रक्रिया अघटित होती आणि 3.5 तास चालली. रुग्णाला 2 दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आणि नंतर जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. आता हा रुग्ण दैनंदिन कामं सहजरित्या करु लागला आहे. महिनाभरानंतर तो आपला दिनक्रम पुन्हा सुरू करू शकेल. 


त्याच्यावर योग्य वेळी उपचार न केल्याने त्याचा मृत्यू झाला असता. तो दैनंदिन कामे करू शकतो परंतु कोणतीही अवजड कामे करू शकत नाही. या रुग्णावर आमच्याकडून तातडीने उपचार आणि व्यवस्थापन करण्यात आले आहे. आमचे रुग्णालय कोणत्याही हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेनंतरची काळजी घेण्यासाठी सुसज्ज असल्याचे सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अभय गायकवाड यांनी सांगितले.


छातीत दुखणे आणि धडधडणे यामुळे मी माझ्या दैनंदिन कामांवर लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. जेव्हा मला माझ्या निदानाची माहिती मिळाली तेव्हा माझे जग उलटे झाले. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मी घाबरलो होतोपरंतु डॉक्टरांनी धीर देत मला पुन्हा सर्वसामान्य आयुष्य जगण्याची प्रेरणा निर्माण केली. डॉक्टरांनी आम्हाला प्रक्रियेबद्दल पुरेपुर माहिती दिली आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनाही मी बरा होईल असे आश्वासनही दिले.


 माझे प्राण वाचवल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानतो. हे रुग्णालय माझ्यासारख्या हृदयविकाराच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी वरदान आहे आणि कोणत्याही आव्हानात्मक केसेस आपल्या कौशल्याने हाताळू शकतात अशी प्रतिक्रिया रुग्ण दिनकर पाटील यांनी व्यक्त केली. 

Post a Comment

0 Comments