कल्याण पूर्वेत साकारली रायगड किल्ल्याची प्रतिकृती


कल्याण : ऑक्सिजन पार्कगणेशवाडीकल्याण (पूर्व ) येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त रायगड किल्ल्याची प्रतिकृती हुबेहूब साकारण्यात आली आहे. आज रायगड किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था, पडझड झालेली आहे. या देखाव्यामधून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सद्यस्थितीत असलेली दुरावस्था देखील दाखवण्यात आली आहे.


रायगड किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. लोकांच्या आग्रहाखातर पुढील  ७ दिवस सदर रायगड किल्लाची प्रतिकृती लोकांना बघण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. हा देखावा बाळा लहाने, प्रशांत मोरे, योगेश बारसकर, दिलीप पाटील, मंगेश दुधाने, पंकज निकम, मनोज रोकडे, जितू यादव, चीलेंद्र नलावडे व अनेक लोकांनी यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली असल्याची माहिती मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी दिली.

Post a Comment

0 Comments