शिवसेनेच्या रक्तदान शिबिरात नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद


डोंबिवली ( शंकर जाधव ) शिवसेना गोग्रासवाडी विभागीय कार्यालय डोंबिवली ( पूर्व )  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी येथील दि लिटील स्टार नर्सरी स्कूल येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते. विभागप्रमुख अमोल पाटील आणि जन्सेविका लीना पाटील यांनी आयोजन केलेल्या या शिबिरात अनेक नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.


   शिबिराचे उद्घाटन शिवसेना नाशिक संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात उपशहरप्रमुख अभिजित थरवळ, शिवसैनिक संजय विचारे,उपविभागप्रमुख आत्माराम सावंत, मंगेश मोरे,विभाग संघटक प्रतिमा शिरोडकर,शाखाप्रमुख प्रशांत खामकर,संजय मांजरेकर,विभागीय कार्यालयप्रमुख दशरथ चव्हाण,ज्येष्ठ शिवसैनिक विकास कदम,जयप्रकाश प्रभूलकर, महिला आघाडी व युवसैनिक उपस्थित होते. 


       विभागप्रमुख अमोल पाटील म्हणाले, `रक्तदान हे जीवनदान , ते वाचवते  दुसऱ्यांचे प्राण` प्रमाणे शिवसेनेने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. शिबिरात  सुमारे १५० रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या.

Post a Comment

0 Comments