क्रीडा विषयातील स्थित्यंतरे दूर करून आधुनिकतेसाठी मदतीचा हात देऊ - नामदेव शिरगावकर


कल्याण : ऑलिंपिक असोसिएशनशारीरिक शिक्षण शिक्षक संघटना व राज्यातील निवडक क्रीडा संघटनांची महाराष्ट्रात पहिल्यांदाच शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विषयक समस्यानोकर भरती या बाबत चर्चा करणेसाठी व प्रश्नांची सोडवणूकीसाठी संघटित व योग्य मार्गाने प्रयत्न व्हावेत म्हणून महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे महासचिव तथा भारतीय ऑलिंपिकचे सहसचिव नामदेव शिरगावकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने ऑलिंपिक कार्यालयपुणे येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्व शारीरिक शिक्षक  व क्रीडा संघटनांचे निमंत्रित सदस्य उपस्थित होते.


सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीस शारीरिक शिक्षण विषयक समस्याझालेले/चालू असलेले प्रयत्नकरावयाचा कृती आराखडा,  विविध शासन निर्णयातील तरतुदीक्रीडा विषयक समस्यात्या सोडविण्यासाठी केलेले प्रयत्नभविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजनानोकरभरतीक्रीडा ग्रेसगुण व विविध प्रश्ना संदर्भात संघटना प्रतिनिधींशी संवाद साधत नामदेव शिरगावकर यांनी मार्गदर्शन केले. कृती गट स्थापन करण्याचे सुतोवाच केले.


       शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना व खेळ संघटना यांचे कार्यप्रणालीत ढवळाढवळ न करता संघटनांच्या कार्याला व कृतीयुक्त विचाराला महाराष्ट्र ऑलिंपिक सर्वतोपरी पाठबळ देईल असे आश्वासन देत भविष्यातील योजना बाबत व कृती आराखड्याच्या मार्गक्रमणाबाबत सभेस माहिती देत याबाबत संयुक्तरित्या कृती गट स्थापन करण्याचे सुतोवाच केले.


       महाराष्ट्र ऑलिंपिकच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मिनी ऑलिंपिक स्पर्धा आयोजन - नियोजनामध्ये क्रीडा संघटकांबरोबर शारीरिक शिक्षकांना बरोबर घेतले जाईल. तसेच प्रत्येक खेळ शारीरिक शिक्षकांच्या आणि क्रीडा संघटना माध्यमातून गावपातळीवर पोहचविण्याचा ऑलिंपिक असोसिएशन प्रयत्न करणार आहे. 


        शारीरिक शिक्षण व क्रीडा विषयातील होणारे नवनवीन बदल शिक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी ऑलिंपिक असोसिएशन शासनाचे सहकार्याने मदत करणार असल्याचे शिरगावकर यांनी सांगितले. यावेळी संघटना प्रतिनिधीं समवेत ऑलिंपिक असोशिएशनचे सहसचिव दयानंदकार्यकारी अधिकारी राजेंद्र घुले उपस्थित होते. सभेच्या नियोजनात शिवाजी साळुंके यांनी मोलाची भूमिका बजावली.


या सभेसाठी राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे राजेंद्र कोतकरमच्छिंद्र ओव्हळअमरावती शारीरिक शिक्षण महामंडळ अमरावतीचे शिवदत्त ढवळेसमन्वय समितीचे विश्वनाथ पाटोळेज्ञानेश काळे, महाराष्ट्र राज्य क्रीडा संघर्ष समितीचे अविनाश ओंबासेमनोज माळी, अनिल एटममहाराष्ट्र शालेय खेळ बचाव समितीचे शाम भोसले,  शिवाजी साळुंकेक्रीडा विकास परिषदेचे अशोक सरोदेपुरुषोत्तम जगतापमुंबई महानगर पालिका युनीटचे डॉ जितेंद्र लिंबकरपँथर स्पोर्ट्सचे संजय कांबळेयुवा संघटनेचे तायप्पा शेंडगेसंदिप मनोरेआगाशियन मंडळाचे गणेश जोरावरलखन मोरे हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments