भिवंडी पालिका सभागृहनेते सुमित पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार


भिवंडी  (प्रतिनिधी ) महानगरपालिका सभागृहनेते पदी सुमित पाटील यांच्या नियुक्ती नंतर सोमवारी सायंकाळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमित पाटील यांनी महानगरपालिका मुख्यालयातील आपल्या दालनात पदभार स्वीकारला .


          या प्रसंगी महापौर प्रतिभा पाटील,आमदार महेश चौघुले, भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी ,भाजपा गटनेता हनुमान चौधरी, निलेश चौधरी यांसह नगरसेवक ,भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.


      केंद्रीय राज्यमंत्री पदी वर्णी लागल्या नंतर कपिल पाटील हे प्रथमच भिवंडी महानगरपालिका मुख्यालयात आल्याने त्यांचे महापौर प्रतिभा पाटील व भाजपा गटनेता हनुमान चौधरी यांनी स्वागत केले .

Post a Comment

0 Comments