जनसेवक राजेश जाधव यांच्या ब्रह्मांड कट्टा व रोटरी क्लबच्या माध्यमातून धर्माचा पाडा येथे संपन्न झाले विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर


ठाणे, प्रतिनिधी  : रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी रोटरी क्लब ऑफ ठाणे एसेस, रोटरी क्लब ऑफ ठाणे रॉयल्स व ब्रह्मांड कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने धर्माचा पाडा ब्रह्मांड येथे विनामुल्य आरोग्य चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ ठाणे एसेसच्या अध्यक्षा सुमेधा गणबवले, रोटरी क्लब ऑफ ठाणे रॉयल्सचे अध्यक्ष उमेश पटेल, ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.


           गावदेवी मित्रमंडळचे अध्यक्ष प्रकाश सुरकर, ब्रह्मांड कट्टा अध्यक्ष महेश जोशी अरुण दळवी,  श्री. डेविड पराझकर,  राजेंद्र गणबावले, निलेश प्रधान, संतोष कदम, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  या विनामूल्य आरोग्य शिबिरात ब्लड शुगर टेस्ट, बोन डेन्सिटी टेस्ट, नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा इ. चाचण्या करण्यात आल्या. रोटरी क्लब व ब्रह्मांड कट्टा यांनी आयोजित केलेल्या या शिबिराला ब्रह्मांड व आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.चार तासाच्या या शिबिरात जवळपास सव्वाशे जणांनी तपासणी करून घेतली.


         शिबिरास आलेल्या नागरिकांना मल्टी विटामिन व कैल्शियमच्या गोळ्या, स्वस्त दरात चष्मे तसेच दात तपासणीसाठी आलेल्या बालगोपाळांना कोलगेटचे वाटप करण्यात आले.  मुलभूत आरोग्यविषयक जागरुकता ही नैतिक व सामाजिक जबाबदारी असून असे समाजोपयोगी उपक्रम ब्रह्मांड कट्टा सदैव राबवत राहिल असे आवाहन जाधव यांनी केले.

Post a Comment

0 Comments