भिवंडीत ठिकठिकाणी भाजपा विरोधात माफी मांगो आंदोलन करीत काँग्रेस तर्फे निदर्शने
भिवंडी दि 9(प्रतिनिधी ) लोकसभेत राष्ट्रपतीं च्या अभि भाषणावर आभार व्यक्त करण्यासाठी बोलत असताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस वर तोंडसुख घेत टीका केली.या भाषणा दरम्यान उत्तर प्रदेश व इतर राज्यात कोरोना संकटमन वाढण्यास महाराष्ट्र सरकार व काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप करीत महाराष्ट्रातून गोरगरीब परप्रांतीय मजुरांना हाकलून लावण्यात काँग्रेस चा हात असल्याचे सांगत काँग्रेस कार्यकर्त्यानी स्थलांतरीत मजुरांना रेल्वेत कोंबून हाकलून लावल्याने देशभर कोरोना फोफावला असा घणाघाती आरोप केला .


          या टिकास्त्रा नंतर काँग्रेस कडून तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात येत असून महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्यांनी केलेली व्यक्तव्य मागे घ्यावीत यासाठी माफी मांगो आंदोलन केले .ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कडून जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई नाशिक महामार्गावर निदर्शने करण्यात आली त्यावेळी काँग्रेसचे ठाणे जिल्हा महासचिव पंकज गायकवाड सह पदाधिकारी, कार्यकार्यें उपस्थित होते.


           तर काँग्रेसचे  भिवंडी शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.या निदर्शनात बलवीर वालीय सह अनेक पदाधिकारी, महिला सह अनेक काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments