प्रांजल आनंद रेड बुल कार्ट फाइटच्‍या पाचव्‍या पर्वाचा विजेता

■लखनौच्‍या प्रांजल आनंदला २०२२ मधील फॉर्म्‍युला १ ग्रॅण्‍ड प्रिक्‍स पाहण्‍यासाठी मिळालेली सर्व देय भरलेली ट्रिप / हौशी गो कार्ट स्‍पर्धेच्‍या पाचव्‍या पर्वामध्‍ये ५ शहरांमधील १००हून अधिक उत्‍साहींचा सहभाग...


भारत, २२ फेब्रुवारी २०२२: बडोदामधील एर्डाज स्‍पीडवे येथे शुक्रवार १८ फेब्रुवारी २०२२ रोजी रेड बुल कार्ट फाइट २०२२ ची रोमहर्षक नॅशनल फायनल पाहायला मिळाली. अद्वितीय रेसिंग अनुभव आणि अद्वितीय हौशी गो कार्ट स्‍पर्धा असलेल्‍या रेड बुल कार्ट फाइटच्‍या पाचव्‍या पर्वामध्‍ये ५ शहरांमधील १०० हून अधिक उत्‍साहींचा सहभाग दिसण्‍यात आला. मुंबई, वडोदरा, हैदाराबद, बेंगळुरू व चेन्‍नई या पाच शहरांमधील (कार्यसंचालनामधील लीडरबोर्डवर आधारित) अव्‍वल २ सहभागींनी शुक्रवार १८ फेब्रुवारी २०२२ रोजी बडोदामधील नॅशनल फायनल्‍समध्‍ये सहभाग घेतला.


         प्रांजल आनंदने ००:२९:१२५ या सर्वात गतीशील लॅप टाइमसह त्‍याच्‍या प्रतिस्‍पर्धींना पराभूत केले आणि तो रेड बुल कार्ट फाइट चॅम्पियन ठरला. त्‍याला २०२२ मधील फॉर्म्‍युला १ ग्रॅण्‍ड प्रिक्‍स पाहण्‍याची आणि अविश्‍वसनीय रेड बुल रेसिंग अनुभवण्‍याची संधी मिळाली.  


         रेड बुल अॅथलीट आणि भारताची यंग रेसिंग सेन्‍सेशन मिरा एर्डा बडोदामधील एर्डाज स्‍पीडवे येथे रेड बुल कार्ट फाइट नॅशनल फायनल्‍समध्‍ये रेसर्ससोबत सामील होताना आणि त्‍यांचे मनोबल वाढवताना दिसण्‍यात आली.


        आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर फॉर्म्‍युला ४ स्‍पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला रेसर रेड बुल अॅथलीट मिरा एर्डा म्‍हणाली, ''आज रोमहर्षक नॅशनल फायनल पाहताना खूपच हृदयस्‍पर्शी वाटले. स्‍पर्धा केलेल्‍या सर्व फायनालिस्‍ट्सचे आणि विशेषत: रेड बुल कार्ट फाइटच्‍या पाचव्‍या पर्वाचा चॅम्पियन ठरलेल्‍या प्रांजलचे अभिनंदन.


        रेड बुल सोबतचा माझा सहयोग खास राहिला आहे आणि मी आम्‍हा रेसर्सना आवडणा-या गोष्‍टी करण्‍यास वाव देण्‍यासाठी ब्रॅण्‍डकडून साह्य घेते. आता पाचव्‍या पर्वामध्‍ये रेड बुल कार्ट फाइटने आपला दर्जा वाढवला आहे आणि हौशी ड्रायव्‍हर्सना रेस करण्‍याची व धमाल, पण स्‍पर्धात्‍मक अनुभव घेण्‍याची अद्भुत संधी देणारी स्‍पर्धा म्‍हणून आपले स्‍थान कायम ठेवले आहे.''


       रेड बुल कार्ट फाइट २०२२ नॅशनल फायनल्‍स विजेता प्रांजल आनंद म्‍हणाला, ''मला माझ्या विजयाचा खूप आनंद होत आहे. रेड बुल कार्ट फाइट २०२२ च्‍या नॅशनल फायनल्‍सचा विजेता ठरल्‍याने खूपच चांगले वाटत आहे. स्‍पर्धा खूपच अवघड होती, पण मला चांगले प्रदर्शन करत माझा सर्वोत्तम देण्‍याचा विश्‍वास होता. रेड बुल कार्ट फाइट हौशी रेसर्ससाठी उत्तम व्‍यासपीठ आहे. ही स्‍पर्धा प्रकाशझोतात येण्‍यास वाव देण्‍यासोबत या वर्षाच्‍या उत्तरार्धात फॉर्म्‍युला १ ग्रॅण्‍ड प्रिक्‍स पाहण्‍याची संधी देखील देते.''


फायनल रेस विनर निकाल:


कार्टरचे नाव / फरक

एकूण वेळ /सर्वोत्तम वेळ


क्रमांक


प्रांजल आनंद

 


१०:००


००:२९:१३५ध्रुव चव्‍हाण


१५ सेकंद


१०:१५


००:३०:१८३मोहमद रिदफ


२ सेकंद


१०:१७


००:२८:५३४आघाडीचा स्‍पोर्टसवेअर ब्रॅण्‍ड पुमाने रेड बुल कार्ट फाइट २०२२ सोबत सहयोग केला. रेड बुल कार्ट फाइट २०२२ नॅशनल फायनल्‍सच्‍या विजेत्‍यांना आकर्षक पुमा मर्चंडाइज मिळतील.


रेड बुल कार्ट फाइटचा हौशी रेसर्स व रेसिंगप्रेमींना कार्टिंगमध्‍ये प्रो बनण्‍याची आणि ट्रकवरील स्‍पर्धात्‍मक, पण धमाल रेसिंग अनुभव घेण्‍याची संधी देण्‍याचा मनसुबा आहे. जगातील सर्वोत्तम एफ१ ड्रायव्‍हर्सना पाहण्‍याची ही सुवर्णसंधी आहे.

Post a Comment

0 Comments