मुंबई , प्रतिनिधी : लालबाग मधील शिवभक्त टॅक्सीचालक संदिप कदम यांनी आज शिवजयंती च्या निमित्ताने सर्व प्रवाशांना मीटर भाड्यामध्ये ५० टक्के सूट देऊन आपल्या प्रती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेली आदराची भावना व्यक्त केली आहे .
हे त्यांचे दुसरे वर्ष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटूंबाने आर्थिक गणित कोलमडले असतानाही त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्याबद्दल समाजात त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
0 Comments