जिल्हा परिषद माजी सदस्य रविश तांडेल यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश


कल्याण : ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रविश तांडेल यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहेकाँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रवेश केला आहे. यावेळी कल्याण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे, किरण केणे उपस्थित होते.


रविश तांडेल यांनी विविध पदे भुषविली आहेत. ठाणे जिल्हा परिषद सदस्य महणून काम केले आहे. तसेच महाराष्ट्र सरपंच असोसिएशन अध्यक्षआदिवासी विकास संस्था अध्यक्षवासुंद्री गालमपंचायत सरपंच अशी विविध पदे भुषविली आहेत. 


तसेच शासकीय योजनाआदिवासी विभाग योजना अन्य योजनेचा लाभ आदिवासी बांधवांना मिळवून दिला आहे. शासकीय कामांचा दांडगा अनुभव असून ठाणेपालघररायगड जिल्ह्यात आदिवासी बांधवांचा दांडगा संपर्क आहेत्याचा फायदा काँग्रेस पक्षाला नक्की होईल रविश तांडेल यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने कल्याण तालुक्यात काँग्रेस कार्यकर्ते व आदिवासी बांधवामध्ये आंनदाचे वातावरणात पसरले आहे.


 याबाबत रविश तांडेल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनीया गांधी व युवा नेतृत्व राहुल गांधी यांचे कुशल नेतृत्व व विचारांना प्रभावित होऊन मी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. 


काँग्रेसचे आदिवासी विभाग प्रदेश अध्यक्ष आनंदराव गेडाम यांच्याकडे काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघेपेण जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय सुपे,रायगड जिल्हा अधयक्ष महेंद्र घरत यांनी माझी नियुक्ती कोकण  आदिवासी विभाग अध्यक्ष पदि साठी शिफारस केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments