भिवंडी महानगरपालिकेत मराठी भाषा गौरव दिन साजरा; प्रशासकीय कामात जास्तीत जास्त मराठीचा वापर करा उपायुक्त दीपक पुजारी यांचे आवाहन


भिवंडी , प्रतिनिधी  :  राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार आज कुसुमाग्रज जयंती निमित्ताने मराठी भाषा गौरव दिन पालिकेत साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालिका उपायुक्त दीपक पुजारी यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळेला सहाय्यक आयुक्त दिलीप खाने, फैजल तातली,  बाळाराम जाधव, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, मार्केट विभाग प्रमुख गिरीश 


         घोष्टेकर , परवाना विभाग प्रमुख ईश्वर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय विभाग प्रमुख नेहाला मोमीन, समाज कल्याण विभाग प्रमुख स्नेहल पून्यार्थी, व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्याच बरोबर दैनिक सामनाचे भिवंडी प्रतिनिधी पत्रकार संजय भोईर, दैनिक सकाळचे भिवंडी प्रतिनिधी शरद भसाळे , दैनिक प्रहारचे  मोनीश गायकवाड, दैनिक क्राईम टाइम्स अभिजीत हिरे व अन्य अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


              कार्यक्रमाच्या सुरुवातीला जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद करून प्रस्तावित केले तर उपायुक्त दीपक पुजारी यांनी  मार्गदर्शन करतना नमूद केले की, राज्य शासनाच्या  मराठी भाषा विभागाने वेळोवेळी आदेश व परिपत्रक जारी केलेली आहेत. दैनंदिन  कार्यालयीन कामकाजात मराठीचा वापर करण्याबाबत वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत.


           मराठी भाषा विभागातर्फे मराठीचा वापर किती प्रमाणात करण्यात येतो याचे भाषा परीक्षण देखील करण्यात येणार आहे. या याबाबत देखील मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या  आहेत. दैनंदिन प्रशासकीय कामात मराठीचा वापर सातत्याने करावा अशा सूचना उपायुक्त दीपक पुजारी यांनी याप्रसंगी केल्या.


           यावेळी दैनिक सामनाचे भिवंडी प्रतिनिधी संजय भोईर यांनी सांगितले की,मराठी भाषेचा वापर हा जास्तीत जास्त केला पाहिजे विशेष करून आजकाल आपण मोबाईल वरून वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा सकाळचे शुभेच्छा संदेश देत असतो याच्यामध्ये जास्तीत जास्त मराठीचा वापर आपण करावा, मराठी भाषेतून वाढदिवसाच्या शुभेच्छा, द्या वेगवेगळ्या मराठी काव्याचा आधार घेऊन शुभेच्छा द्याव्यात मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त वापर या मोबाईलवरून करण्यात यावा जेणेकरून  मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्यास मदत होईल, तसेच मराठीचा वापर दैनंदिन आर्थिक व्यवहारात  देखील करणे महत्त्वाचे आहे असे देखील संजय भोईर यांनी याप्रसंगी नमूद केले.


          तर, पालिकेच्या माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. एकूण 11 माध्यमिक विद्यालये शहरामध्ये सद्या कार्यान्वीत आहेत.  सर्व माध्यमिक विद्यालयात  मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी वर्गाकरिता  मराठी काव्य वाचन स्पर्धा,वकृत्व स्पर्धा, पोवाडा गायन इ. स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेतील विविध महान ग्रंथ व कवी यांच्या बद्दल माहिती सांगितली.आणि आपल्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात 


            मराठी भाषेला अधिकाधिक संपन्न  करण्यासाठी व तिच्या समृद्धीसाठी ज्या साहित्यिक महात्म्यांनी आपले जीवन व्यतीत केले. त्यांच्याबद्दल आपण ऋणी असले पाहिजे असे संदेश दिला. तसेच प्रत्येकाने मराठी भाषेतील साहित्याचा अभ्यास करून तिची किर्ति जगामध्ये दुरवर पसरली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमांमध्ये मराठी भाषा या दिनानिमित्त मराठी भाषेचे महत्व यावर निबंध स्पर्धा सुघ्दा आयोजित करण्यात आली होती तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम पण आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमांमध्ये सर्व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थी यांनी चांगला सहभाग नोंदविला. तर अन्य एका कार्यक्रमात 


            डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात मराठी भाषा दिना निमित्ताने मराठी भाषेवरील विविध पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, या वेळेला वाचनालयाच्या विभाग प्रमुख नेहाला मोमीन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त मराठी पुस्तक याचा वापर वाचकांनी करावा असे आवाहन विभाग प्रमुख नेहाला मोमीन यांनी केले.

Post a Comment

0 Comments