सिग्नल तोडणाऱ्यां १३०८ जणांना ई चलाना द्वारे दंड वाहतूक पोलिसांची कारवाई


कल्याण : कल्याण शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत झाली असून आतापर्यंत  १३०८ जणांना ई चलान द्वारे दंड आकारण्यात आला असल्याचे कल्याण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी सांगितले.


     कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत कल्याण पश्चिम शहरात आधारवाडी चौकखडकपाडा चौकसंदिप हॉटेल चौकप्रेम ऑटो पौर्णिमा चौक येथे तर कल्याण पूर्वेत आनंद दिघे चौकात नागरीकांच्या सुखसोई करीता तसेच वाहतूक कोंडी टाळणेअपघाताचे प्रमाण कमी करण्या करीता व वाहन चालकांना शिस्त लागण्याकरीता सिग्नल यंत्रणाव सी.सी.सी.टी.व्ही. कॅमेरे यंत्रणा बसविण्यात आलेले आहेत.


वाहतूक नियमांचे सिग्नल जंपीग व स्टॉप लाईन उल्लंघन करणाऱ्या कसूरदार वाहनांवर ऑनलाईन इ चालानद्वारे कारवाई सुरू करण्यात आली आहे. पहिल्यांदा सिग्नल तोडल्यास ५०० रुपये दंड तर दुसऱ्यांदा सिग्नल तोडल्यास १५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत १३०८ जणांवर इ चलानद्वारे दंड करण्यात आला असून यामध्ये २६६ चारचाकी, २४० तीन चाकी आणि ८०२ दुचाकींचा समावेश आहे.  


     वाहन चालवत असताना चौकामधील वाहतूक नियमनाकरीता बसविण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेतील लाल-पिवळया हिरव्या रंगाच्या सिग्नलचे तंतोतत पालन करूनचौकामध्ये असलेल्या सफेद रंगाच्या स्टॉप लाईनचे काटेकोरपणे पालन करावे. या नियमांचा भंग झाल्यास वाहनावर चौकामध्ये बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक कॅमेरामधून या वाहनावर प्रचलित मोटर वाहन कायदयान्वये ऑनलाईन दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. 


        तसेच सिग्नल अगर स्टॉप लाईनचे उल्लंघन व इतर ऑनलाईन चलनाच्या दंडात्मक कारवाईबाबत काही तक्रार अगर शंका असल्यास महा ट्राफिक अप" आपले मोबाईलमध्ये समाविष्ट करून त्याचा वापर करावा याची कल्याण शहरामधून प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांनी व वाहन चालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments