मराठी भाषा दिवस मराठी स्वाक्षरीला उत्स्फूर्त प्रतिसाद


ठाणे , प्रतिनिधी  :  भारतात पहिल्या दहा भाषांमध्ये  बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेला अजूनही केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे मराठी भाषेचं जागरण सर्वच स्तरातून होणं महत्वाचं आहे आणि याचाच एक भाग म्हणून मराठी भाषा दिनानिमित्त ठाणे जिल्हा काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या वतीने ठाणे पूर्वतील अष्टविनायक चौकात मराठी स्वाक्षरी स्पर्ध्येच आयोजन करण्यात आलं होतं.


         मुंबई ठाण्यासारख्या शहरातच मराठीचं वावडं असल्याचा भास होतो. अनेकदा दोन माणस बोलत असताना मराठी कमी आणि इंग्रजी आणि हिंदी भाषेत बोललं जातं,काहीवेळा आपण महाराष्ट्रात आहोत की दुसऱ्या राज्यात आहोत असाच भास होतो.वाढत्या इंग्रजी शाळा आणि मराठी शाळांच पतन यामुळे मराठी भाषा कुठे तरी हरवत जात आहे.मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करणे गरजेचे आहे. आणि हाच धागा पकडून मराठी भाषा दिनानिमित्त ठाणे जिल्हा काँग्रेस सांस्कृतिक विभागाने मराठी स्वाक्षरी स्पर्ध्येचे आयोजन केले असल्याची माहिती शहर काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केली. 


           ठाणे पूर्वतील अष्टविनायक चौकात काँग्रेसचे सांस्कृतिक विभाग अध्यक्ष स्वप्नील कोळी यांनी आयोजित केलेल्या या स्वाक्षरी स्पर्ध्येला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता सकाळ पासून विभागातील सर्वच स्तरातील नागरिकांनी फलकावर सही करून मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त केलं या स्पर्ध्येत पत्रकार प्रशांत सिनकर यांच्या स्वाक्षरीला प्रथम क्रमांक मिळाला. तर द्वितीय क्रमांक जेष्ठ नागरिक विजय नाखवा यांना मिळाला. 


            या स्पर्ध्येत सह्याजीराव सतीश चाफेकर यांनी परिक्षक म्हणून भूमिका बजावली.या कार्यक्रमाला ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण,भालचंद्र महाडिक,सेवादल अध्यक्ष शेखर पाटील,ओ.बी.सी.विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे,निलेश शेंडकर,काँग्रेस ब्लाॅक अध्यक्ष निलेश अहिरे,काँग्रेस प्रवक्ते गिरीश कोळी,मंजूर खत्री,काँग्रेस उपाध्यक्ष सुभाष ठोम्बरे,अरूण राजगुरू,प्रभाग काॅग्रेस अध्यक्ष योगेश मयेकर,प्रवीण खैरालिया,अविनाश घाग,शिवाजी पिंगळे आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments