राहनाळ शाळेत शिवचरित्र पारायणाची समाप्ती


कल्याण : राहनाळ गावचे सरपंच राजेंद्र मढवी, माजी सरपंच तथा ग्रामपंचायतीच्या सदस्या मनिषा भोईर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिला कडू, उपाध्यक्ष मनाली जाधव व ग्रामस्थ यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाले. विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या कथा सांगितल्या, गाणी, पोवाडे व पाळणा सादर केला.


              सरपंच राजेंद्र मढवी, मनिषा भोईर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा दिला.
विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाबाई, शिवरायांचे शूर मावळे यांच्या वेशभूषा केल्या होत्या.


            छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय भवानी जय शिवाजी... च्या गजरात शाळेचा परिसर दुमदुमून गेला होता. गेले चार दिवस शिवचरित्र पारायण शाळेत सुरू होतं त्याची समाप्ती झाली.

Post a Comment

0 Comments