निलंबीत पोलिस कर्मचाऱ्याची लोकल खाली आत्महत्या


कल्याण ( शंकर जाधव )  एका निलंबीत पोलिस कर्मचाऱ्याचा कल्याण - विठ्ठलवाडी रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळाजवळ बुधवारी रात्री साठे आठ वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आला.दिलीप सकपाळ (३३)  असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव असून ते बदलापूर येथे राहत होते. दिवसापूर्वी त्यांची बदली घाटकोपर येथील जीआरपी मुख्यालयात झाली होती. 


           सकपाळ  यांना दारु प्यायचे व्यसन होते.  त्यामुळे ते कामावर  गैरहजर राहत होते. या कारणावरुन त्यांना १५ दिवसांपूर्वी  निलंबन करण्यात आल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांनी दिली . काल रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे मार्गा दरम्यान त्यांचा मृतदेह रेल्वे रूळालगत अप लाईनला आढळून आला.         माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दिलीप यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांचा मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. 

Post a Comment

0 Comments