छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज - माजी आमदार रुपेश म्हात्रे


भिवंडी  दि. १९ (प्रतिनिधी  ) छत्रपती शिवरायांचा इतिहास व त्यांच्या कर्तृत्वाचा अभ्यास करून शिवरायांचे विचार तरुणांनी प्रत्यक्षात आत्मसात करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन भिवंडी पूर्व चे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी खारबाव ग्रामपंचायतीच्या वतीने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती अश्वरूढ पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी शनिवारी शिवजयंतीनिमित्त व्यक्त केले.


          भिवंडी तालुक्यातील खारबाव ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून व व्यावसायिक मयुर म्हात्रे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुढ पुतळा उभारण्यात आला आहे. भव्य अशा पुतळ्याचे अनावरण राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते होणार होते. मात्र काही कारणास्तव उद्घाटन कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाड अनुपस्थित राहिल्याने माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी या पुतळ्याचे अनावरण केले. 


          छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याचे उद्घाटन व विधीवत पूजा करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे असे मत यावेळी आमदार माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी या कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले. 

 
         याकार्यक्रमा प्रसंगी समाज कल्याणन्यासचे संस्थापक अध्यक्ष डॉ सोन्या पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश गुळवे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते कमलाकर टावरे, ज्येष्ठ नगरसेवक भगवान टावरे यांच्यासह खारबाव ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच , उपसरपंच व सदस्य कमिटी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     
           खारबाव गावातील बांधकाम व्यावसायिक मयुर म्हात्रे यांनी त्यांच्या आजोबांच्या स्मरणार्थ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी निधी दिली असल्याने ग्रामपंचायत सरपंच व मान्यवरांनी म्हात्रे परिवाराचे विशेष अभिनंदन केले. 

Post a Comment

0 Comments