विजयवाडा दि.14 - भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांनी आपले जीवन कुर्बान केले. शहीदांनी स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. जातीधर्मातील भेदभाव मिटवून राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी कटिबद्ध होऊया असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी गुंटूर येथे केले.
येथील विज्ञान विद्यापीठात आयोजित आजादी का अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नामदार रामदास आठवले बोलत होते .यावेळी केंद्रीय राज्यमंत्री फगनसिंह कुलस्ते आदी अनेक मान्यवर उपस्थित होते
गुंटूर च्या विज्ञान विद्यापीठात 80 हजार विद्यार्थी शिकत आहेत विज्ञान विद्यापीठातर्फे आजादी का अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती कार्यक्रमास विद्यार्थी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी भव्य मिरवणूक काढून केंद्रीयाज्यमंत्री रामदास आठवले यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
0 Comments