शिवसेनेच्या आरोग्य शिबिरात हजारो नागरिकांची आरोग्य तपासणी

■शिवसेना कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे यांचे आयोजन...


कल्याण : कल्याणमध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात हजारो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिवसेना कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे यांच्या पुढाकाराने शिवसेना फ्लॉवर व्हॅली बेतूरकर पाडा विभाग, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना नेते, नगरविकास मंत्री, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर आणि मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन शिवसेना बेतूरकर पाडा शाखा याठिकाणी करण्यात आले होते.


       या आरोग्य शिबिरात किडनी स्टोन शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, कॅन्सर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, जनरल ओ.पी.डी., ई.सी.जी., अॅन्जिओग्राफी, अॅन्जिओप्लास्टी, बोन डेन्सिटी, बी.पी, शुगर, थायरॉईड आदींची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी डोळे तपासणी केलेल्या नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले. 


         तर ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशांवर शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार असल्याची माहिती विजया पोटे यांनी दिली. यावेळी माजी नगरसेवक अरविंद पोटे, सोनाली औटी, रामचंद्र औटी, केदार गावडे, दिगंबर ठाणगे, अरुण चौधरी, रमेश मोरे, कदम, निशा गुरव, गांगुर्डे, राणी करंडे, मोहिनी गावकर, रेखा खरुळे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.        

Post a Comment

0 Comments