विझ केअरकडून उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार

■ वैयक्तिक काळजी आणि स्वच्छता उत्पादनांच्या नवीन लक्झरी रेंजचा समावेश ~


मुंबई, २१ फेब्रुवारी २०२२ : वेगाने बदलत्या फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) उद्योगात आपले स्थान स्थापित करत असताना विझ केअर या भारताच्या आघाडीच्या वैयक्तिक काळजी आणि स्वच्छता ब्रँडने वैयक्तिक काळजी आणि स्वच्छता उत्पादनांच्या नवीन श्रेणीच्या अनावरणाची घोषणा केली आहे. या नवीन आलेल्या उत्पादनांमध्ये विझ लक्स स्किन क्लिअरिंग फेशियल वाइप्स, बॉडी मिस्ट, २-इन-१ हँड अँड बॉडी वॉश, बॉडी लोशन, फोमिंग हँडवॉश व फेसवॉशचा समावेश आहे आणि ती अत्यंत सुंदर रॅपिंग्समध्ये आहेत.


      विझची नव्याने आलेली लक्स पर्सनल केअर आणि हायजिन रेंज विविध प्रकारच्या घटकांनी बनलेली आहे. यात ट्रीटेड वॉटर, ग्लिसरिन, कोकामिडोप्रोपाइल बेटाइन, डिकाइल ग्लुकोसाइड, ट्रिथेनोलामाइन, कोको-ग्लुकोसाइड आणि ट्रिक्लोसन तसेच विविध प्रकारच्या इंग्लिश रोजचा सुगंध आणि टँगरिन तसेच काही परवानगी दिलेले रंगही समाविष्ट आहेत. त्याशिवाय विझ फोम हँडवॉशमध्येही तुलसी, नीम, एलोव्हेरा आणि लेमन अशा १०० टक्के नैसर्गिक अर्कांचा समावेश आहे. विझ केअरची सर्व उत्पादने पॅराबीन आणि सल्फेटमुक्त आहेत.


     विझ केअरच्या सहसंस्थापक सौ. मनीषा रितेश धिंग्रा म्हणाल्या की, “आजच्या काळात ग्राहक स्वतःच्या काळजीबाबत पूर्वीपेक्षा अधिकाधिक जागरूक होऊ लागले आहेत आणि त्यामुळे ते साधनांनी सक्षम उत्पादनांच्या शोधात आहेत. या नवीन आणि प्रीमियम उत्पादनांसोबत आम्ही सध्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि आमचे ग्राहकांप्रति संरक्षणाचे खास वचन कायम राखण्यासाठी सज्ज आहोत.”


      आरोग्य, कल्याण आणि स्वच्छता सुधारण्यासाठी सर्वोच्च दर्जाची उत्पादने देण्यासाठी वचनबद्ध असलेली विझ आपल्या सर्व ग्राहकांना आनंद देण्यासाठी सज्ज आहे. ग्राहक ही उत्पादने कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून https://www.wizvalue.com/ किंवा अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या लोकप्रिय ई-वाणिज्य व्यासपीठावरून खरेदी करू शकतात.

Post a Comment

0 Comments