डोंबिवलीत महाविकास आघाडीची निदर्शने

 


डोंबिवली ( शंकर जाधव )  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यभर निदेशने केली.शनिवारी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस अश्या महाविकास आघाडीने भाजपाविरोधात जोरदार निदर्शने केली. 


         भाजपाचे केंद्रातील सरकार हे दडपशाहीचा अवलंब करत  ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ला हाताशी धरून व खोट्या केसेस दाखल करून  ऐन निवडणुकीच्या तोंडावर, सर्वसामान्य जनसामान्यांमध्ये महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारची छबी खराब करण्यासाठी व बदनामी करण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीतील मंत्र्यांना  अटक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Post a Comment

0 Comments