मराठी एकीकरण समितीच्या पाठपुराव्या नंतर आयडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये मराठी भाषा


कल्याण : मराठी भाषा दिवस जवळ आला असून अशातच मराठी एकीकरण समितीच्या पाठपुराव्यानंतर आयडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात आला आहे.


             रिजर्व बँकेच्या ०३ नोव्हेंबर २००८ साली काढलेल्या परिपत्रका नुसार राज्यातील प्रत्येक बँकेत ग्राहक निगडित कागदपत्रे, एटीएम सुविधा ह्यांमध्ये राज्याची अधिकृत मराठी भाषा उपलब्ध करून देणे बंधनकारक असतांना सुद्धा काही बँक आस्थापना ह्या मराठी भाषा डावलून केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषा अनधिकृत पणे नागरिकांवर लादत असतात. असेच एक प्रकरण कल्याणच्या आयडीएफसी बँकेच्या कार्यालयात आणि एटीएम मशीन मध्ये मराठी भाषा डावलून हिंदी आणि इंग्रजी ची सक्ती केली जात होती.


         ग्राहक ही नियमांची माहिती नसल्याने इतर भाषेची सक्ती सहन करून मराठी भाषेच्या होत असलेल्या अपमानात न कळत सहभागी होत होते. पण हीच गोष्ट मराठी एकीकरण समितीचे कल्याण शहर समन्वयक भूषण  पवार ह्यांच्या लक्षात आली. 


       त्याच बँकेत खाते असल्याने नित्यनेमाने बँकेत व्यवहार होत असल्याने मराठी भाषेचा अपमान सहन करावा लागत होता. अखेर कायद्याला धरून भूषण पवार ह्यांनी बँकेजवळ संबंधित गोष्टींला वाट देत सतत एक वर्ष तक्रार करत बँकेला मराठी भाषा उपलब्ध करून देण्यात भाग पाडले.

Post a Comment

0 Comments