राहनाळ शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त विविध प्रयोगांचे आयोजन तसेच भन्नाट आयडिया या शॉर्टफिल्मचे उद्घाटन.


कल्याण : मुलांना सातत्याने प्रश्न पडायला पाहिजेत्या प्रश्नांची उत्तरं शोधायला पाहिजेम्हणजेच आपण विज्ञानाच्या जवळ जाऊन नवनवीन प्रयोग करायला शिकू असे उद्गार राहनाळ गावचे सरपंच राजेंद्र मढवी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित राहनाळ शाळेतील कार्यक्रमात काढले.


२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने विज्ञान प्रदर्शनविज्ञानाचे प्रयोग या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच राजेंद्र मढवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ लिपिक संदिप भोईरशाळा व्यवस्थापन समिती सदस्य विलास रामेष्टे हे उपस्थित होते. डॉ. सी व्ही रमण यांनी भौतिकक्षेत्रामध्ये प्राप्त केलेल्या नोबेल पुरस्कारप्रित्यर्थ राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो.


यावेळी मुलांनी छोटे छोटे प्रयोग स्वतः तयार करून सादर केले. शेतीसाठी पाणीपुरवठा करणेजलचक्रपाण्याचा पृष्ठीय ताणज्वलनासाठी ऑक्सिजनची गरजओला कचरा सुका कचरापाण्यात विरघळणारे पदार्थ व न विरघळणारेराहनाळ गावअसे छोटे छोटे प्रयोग विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडले होते. मूत्राशयचेतापेशीत्वचेची रचनामानवी डोळामेंदूची रचना यांच्या रांगोळ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने काढल्या होत्या. मढवी यांनी सर्व प्रयोग पाहून विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले.


याच कार्यक्रमामध्ये अजय पाटील लिखित दिग्दर्शित भन्नाट आयडिया हे प्लास्टिक मुक्तीच्या विषयावर बनवलेल्या शॉर्ट फिल्म चे उद्घाटन गावचे सरपंच राजेंद्र मढवी यांच्या हस्ते करण्यात आले. या शॉर्ट फिल्ममध्ये श्वेता टोळेराधिका पाटीलपूजा ठाकूर या मुलींनी अभिनय केला आहे.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अजय पाटीलअनघा दळवीचित्रा पाटीलरसिका पाटीलसंध्या जगताप या शिक्षकांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या जगताप तर आभार प्रदर्शन रसिका पाटील यांनी केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रयोगाचे सर्व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments