वन विभागाच्या कारवाईत खैर सोलीव लाकडाचा साठा जप्त ठाणे वन विभागा तील पडघा रेंज ची धडक कारवाई


कल्याण : वनविभागाच्या कारवाईत खैर सोलीव लाकडाचा साठा जप्त करण्यात आला असून ठाणे वनविभागातील पडघा रेंजने धडक कारवाई केली आहे.


पोलीस विभागाला मिळालेल्या गुप्त बातमीवरून सहा. वनसंरक्षक मांडवी स्थित ठाणे सुनील नाईक यांच्या  मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल पडघा एस. बी. देवरे यांच्या नेतृत्वाखाली पडघा रेंज स्टाफ व स्थानिक पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने मौजे बोरिवली पडघा गावात एका कंपाउंड मध्ये छापा टाकून खैर सोलीव लाकडाचा माल जप्त करण्यात आला. 


जागेवर एक खैर सोलीव किटा मालाने भरलेला एक टेम्पो मिळाला. तो टेम्पो ताब्यात घेऊन भरलेला मालासह पडघा विक्री आगार येथे आणून ठेवला आहे. सुमारे ६ घनमीटर खैर सोलीव माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पूढील तपास चालू आहे.


या कारवाईत मा वनक्षेत्रपाल भिवंडी आर्देकरवनपाल पडघा दिनेश माळीवनपाल किरवली एस. बी. खरेवनपाल वडपा विलास निकमवनपाल पाच्छापूर विजय पवारवनपाल दिघाशी श्याम चतुरेवनरक्षक डालेपाडा कुंदन भोईरवनरक्षक पाच्छापूर अमित कुलकर्णीवनरक्षक दिघाशी विलास सपकाळवनरक्षक सांगावं अजय राठोडवाहन चालक श्री विकास उमटोलवनमजुर संतोष गोडांबे यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments