महाराष्ट्राच्या ५५व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा हर्षोल्हासात भव्य शुभारंभ

■मानवतेची सेवा हाच परम धर्म होय सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज...


कल्याण : संतांच्या हृदयात सर्वांच्या भल्याची कामना असते. त्यांचे प्रत्येक कर्म मानवतेच्या भल्यासाठी घडत असते.’ असे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या ५५व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा विधिवत शुभारंभ करताना शुक्रवारी मानवतेच्या नावे दिलेल्या संदेशामध्ये व्यक्त केले.  


      चेंबूर स्थिन निरंकारी सत्संग भवनातून या संत समागमाचे थेट प्रक्षेपण संत निरंकारी मिशनची वेबसाईट www.nirankari.org आणि साधना टी.वी.चनलच्या माध्यमातून केले जात आहेज्याचा आनंद देश-विदेशामधील लक्षावधी भाविक-भक्तगण घरबसल्या प्राप्त करत आहेत.      सद्गुरु माता सुदीक्षाजींनी आपल्या भावना अभिव्यक्त करताना म्हणाल्याकी सर्वांभूती प्रेमदयाकरूणासहनशीलतेचा भाव मनामध्ये धारण केल्यास या जगाला स्वर्गमय केले जाऊ शकते. सत्गुरू माताजींनी सांगितलेकी याची स्वत:पासून सुरुवात करुन आपले कुटुंबआपली वसाहत, आपले शहरआपले राज्यआपला देश आणि संपूर्ण विश्वासाठी योगदान देणे ही आपली जबाबदारी आहे.      समागमाचा प्रथम दिवसाचा कार्यक्रम संपन्न होताना जगभरातील भाविक भक्तगणांना आपले पावन आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरु माताजींनी प्रतिपादन केलेकी  जोपर्यंत मनात विश्वास नाही तोपर्यंत भक्ती करणे शक्य नाही. आपण क्षणभंगूर वस्तूंवर विश्वास न ठेवता वास्तविक रुपात स्थायी राहणाऱ्या या अपरिवर्तनशील निराकार प्रभूवर विश्वास ठेवायला हवाज्याचे अस्तित्व शाश्वत आणि अनंत आहे.


      या व्यतिरिक्त एक अन्य उदाहरण देऊन सद्गुरु माताजींनी सांगितले, की जेव्हा परमात्म्याशी आपले नाते जोडले जाते तेव्हा भक्त सदोदित प्रत्येक परिस्थितीत कृतज्ञतेचा भाव प्रकट करत असतो. प्रार्थना आणि आराधना आमच्या भक्तीला आणखी परिपक्व बनवत असतात. मग जीवनातील चढ-उतार आम्हाला प्रभावित करत नाहीत.


      विश्वासाला दृढता प्रदान करताना सद्गुरु माताजींनी सांगितले कीकित्येकदा आपण अशी चतुराई करतो ज्यामुळे त्यावेळी आमचे कार्य कौतुकास्पद ठरतेपरंतु अशा चलाखीमुळे कित्येकदा आपण दुसऱ्याच्या हृदयाला आघात पोहचवत असतो. तेव्हा आपण असे करु नये ज्यामुळे इतरांचा विश्वास डळमळीत होईल. आपण स्वत:चा विश्वास दृढ करत असतानाच इतरांनाही दृढता प्रदान करायची आहे.


      सद्गुरु माताजींनी एका उदाहरणाद्वारे समजावलेकी जिथे विश्वास आहे तिथे प्रमाणाची आवश्यकता असत नाही. एका बालकाला आपल्या मातेने तयार केलेले भोजन अत्यंत स्वादिष्ट असते यावर ठाम विश्वास होता. त्या मुलाने स्वत: चाखून न पाहताच शाळेतील सर्व मित्रांना त्याचा स्वाद घेण्यासाठी आमंत्रित केले. हा त्या मुलाचा आपल्या आईवरील ठाम विश्वास आहे. आपणही परमात्म्याच्या प्रति पूर्ण समर्पित होतो तेव्हा आपल्या मनामध्येही असाच दृढ विश्वास निर्माण होतो.


      आपणही या प्रभुच्या इच्छेमध्ये बिनशर्त समर्पित व्हायचे आहे. ही बाब आणखी स्पष्ट करताना सद्गुरु माताजींनी सांगितलेकी एका शिष्याने आपल्या गुरुला एक भेटवस्तू अर्पण केली. गुरुने ती वस्तू वाहत्या नदीत फेकून दिली. त्याला शिकवण देण्याच्या उद्देशाने गुरुने त्याला समजावलेकी जर तू काही मला अर्पण केले असशील तर ते माझ्यावर सोडून दे. तात्पार्य जेव्हा आपण काही अर्पण केल्यानंतर पुन्हा त्याची आसक्ती बाळगू नये. ही वअस्घ्था आमच्या जीवनात तेव्हाच येते जेव्हा आम्ही अंतर्बाह्य एकसमान होतो.


      या व्हर्च्युअल रुपातील संत समागमामध्ये भाग घेणाऱ्या वक्त्यांनी गीतकविता आणि विचारांच्या माध्यमातून आपले भाव प्रकट केले जे अनेकतेत एकतेचे सुंदर चित्रण प्रस्तुत करत होते.      उल्लेखनीय आहेकी संत समागमाच्या दरम्यान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शुभहस्ते विश्वासभक्ति, आनंद’ नावाने प्रकाशित करण्यात आलेल्या वार्षिक स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. यामध्ये मराठी, हिंदीगुजराती आणि नेपाळी भाषांतील आध्यात्मिक लेखांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments