भिवंडीत २८ वर्षापासून 'या' कारणामुळे माघी गणपती; यंदाच्या गणरायाची सजावट वीटभट्टीची.. ..


भिवंडी दि 7 (आकाश गायकवाड  ) : माघी गणेश उत्सवाची परंपरा अलीकडयाच्या काळात वाढत असून जिल्ह्यातील शेकडो कुटंब पाच दिवसाचा माघी गणेश उत्सव साजरा करून भक्तिभावाने गणरायाची पूजाअर्चा करीत असतात, त्यामध्ये  भिवंडीतील पाये गावात राहणारे रायकर कुटूंब आहे. २८ वर्षांपूर्वी  मुलगा जन्माला आला. तेव्हापासून रायकर कुटुंब माघी गणपतीची स्थापना करीत आहेत. यंदाच्या गणरायाचा  देखावाही तितकाच बोलका असल्याचे त्याची  चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. 

 

७ मुलीनंतर ८ वा मुलगा जन्माला आल्याने गणरायाची स्थापना.. 


            गणेशश्वर रायकर (वय ५४) हे कुटूंबासह भिवंडी तालुक्यातील पाये गावात राहतात. त्यांचा वडिलोपार्जित वीटभट्टीचा व्यवसाय असून त्यांना ७ मुली असून यापैकी ५ मुलींचा विवाह त्यांनी केला आहे. मात्र त्यांना मुलगा नव्हता.  त्यामुळे मुलगा व्हावा म्हणून त्यांनी गणपतीला नवस केल्याचे सांगितले. त्यानंतर २८ वर्षानंतर त्यांच्या कुटूंबात मुलगा जन्माला आला. त्याचे नाव कृष्णा असून हा ज्यावर्षीत जन्माला आला. तेव्हापासून म्हणजे २८ वर्ष सलग रायकर कुटूंब घरगुती माघी गणेश उत्सव साजरा करतात. 

 

वीटभट्टी मजुरांचे चलचित्रामुळे देखावा अधिकच आकर्षित .. 


        लॉकडाऊनमध्ये  आदीच ठप्प झालेला वीट विक्रीचा व्यवसाय त्यांनतर अवकाळी पावसाने वीटभट्टीसह कच्च्या विटांचे झालेले नुकसान पाहता त्यांनी पुन्हा गणरायला साकडे घातल्याचे सांगितले.  यंदाच्या गणरायची  वीटभट्टी लगत असलेल्या मजुरांच्या झोपडी सारखा हूबेहून देखावा करून त्यामध्ये स्थापना केली.


         शिवाय झोपडी शेजारीच वीटभट्टी वरील मजुरांचे काम करतानाचे चलचित्र दाखवून त्यांनी देखावा साकारला. आता हा गणरायाचा देखावा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ग्रामीण भागातील भाविकांनी देखावा पाहण्यासाठी व गणरायाचे दर्शन घेण्यासाठी रायकर त्यांच्या घरी एकच गर्दी केली आहे.

Post a Comment

0 Comments