स्टार्टअप्सना निधी उभारण्याची संधी

■९युनिकॉर्न्स आणि व्हेंचर्स कॅटालिस्ट्सद्वारे डीडे स्टार्टअप्सच्या दुसऱ्या समूहाचे अनावरण ~


मुंबई, २४ फेब्रुवारी २०२२ : आपल्या पहिल्या डेमो डेला मिळालेल्या प्रचंड यशानंतर भारतातील आघाडीचा अ‍ॅक्सलरेटर ९युनिकॉर्न्स आणि सुरुवातीच्या टप्प्यातील गुंतवणूकदार व्हेंचर कॅटालिस्ट्स यांनी २४ मार्च, २०२२ रोजी, दुसरा ग्लोबल डेमो डे (डीडे २) घेणार असल्याची घोषणा केली आहे. डीडे २ दरम्यान, सुरुवातीच्या तसेच वाढीच्या टप्प्यात असलेले ३६ निवडक स्टार्टअप्स जागतिक व देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या समूहापुढे त्यांचे बिझनेस पिचेस सादर करतील. हा दोन दिवसांचा कार्यक्रम ९युनिकॉर्न्स व व्हेंचर कॅटालिस्ट्समधील प्रत्येकी सुमारे १८ निवडक स्टार्टअप्सच्या शोकेसिंगसह सुरू होईल.


     ९युनिकॉर्न्स आणि व्हेंचर कॅटालिस्ट्सचे सहसंस्थापक डॉ. अपूर्व रंजन शर्मा म्हणाले, "स्टार्टअपच्या संस्थापकांमधील स्पर्धेची भावना कायम ठेवण्यासाठी आम्ही डीडेसारख्या अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून विविध मार्ग सातत्याने शोधत असतो. दोन दिवसांच्या पिचिंग सत्रात पसरलेला डीडे स्टार्टअप्सना अधिक मोठा निधी उभारण्यास मदत करतो. स्टार्टअप्सना डीडेसाठी एकत्र करण्यापूर्वी आम्ही त्यांच्याशी त्यांच्या उत्पादनाच्या विकासाबद्दल, टीम्सबद्दल, त्यांच्या व्यवसाय प्रारूपाला अधिक सफाई देण्याबाबत आणि त्यांचे रूपांतर उच्च वाढीच्या व्यवसायांमध्ये करण्याबाबत, विस्तृतपणे चर्चा करतो. आमचा पहिला डीडे अत्यंत यशस्वी ठरला होता आणि आम्हाला या दुसऱ्या डीडेद्वारे आमचाच विक्रम मोडण्याची इच्छा आहे.”


        स्टार्टअप्सचे रूपांतर दमदार, कामाचा पसारा वाढवण्यास तसेच निधी उभारण्यास सक्षम व्हेंचर्समध्ये होतील याची निश्चिती करणे ही डीडेमागील कल्पना आहे. डेमो डेज हा भारतीय स्टार्टअप परिसंस्थेचा महत्त्वपूर्ण भाग होत आहे. सध्या या परिसंस्थेत ५०,००० स्टार्टअप्स व ९० युनिकॉर्न्स आहे आणि या सर्व कंपन्या प्रचंड प्रमाणात जागतिक गुंतवणूक आकर्षित करून घेत आहेत. २०२१ मध्ये या कंपन्यांमध्ये ३६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली, असे उद्योगक्षेत्रांतील विविध अहवालांतून स्पष्ट होते. यांतून भारतातील स्टार्टअप्सची मोठे मूल्य असलेले व अब्जावधी डॉलर्सचे व्यवसाय निर्माण करण्याची क्षमता सिद्ध होते.


       यात सहभागी होणाऱ्या स्टार्टअप्स, ईव्ही, हेल्थटेक, कंझ्युमर इंटरनेट, डेटा अॅनालिटिक्स, एआय, फिनटेक, अॅग्रिटेक आणि एडटेक अशा विविध क्षेत्रांतील आहेत. व्हर्च्युअल पद्धतीने घेतला जाणारा डीडे दोन दिवसांत अभूतपूर्व अशा संधी घेऊन येणार आहे. यामुळे स्टार्टअप्स, जागतिक व देशांतर्गत व्हेंचर कॅपिटल फर्म्स, कौटुंबिक कार्यालये, युनिकॉर्न संस्थापक, एंजल गुंतवणूकदार व सीएक्सओंना, परस्परांबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळेल, त्यांच्यात संवाद घडून येईल.


       दुसऱ्या डीडेमध्ये १५०० हून अधिक गुंतवणूकदार सहभागी होणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये झालेल्या पहिल्या डीडेमध्ये ही संख्या ९०० होती. हा कार्यक्रम खूपच यशस्वी ठरला होता. यात ३२ स्टार्टअप्सनी सहभाग घेतला होता आणि त्यातील २८ स्टार्टअप्सनी मिळून सुमारे १२६ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा केला. फिनटेक, ईकॉमर्स आणि सास क्षेत्रांतील स्टार्टअप्सनी सर्वाधिक निधी प्राप्त केला. सहभागी झालेल्या स्टार्टअप्सपैकी सुमारे ४५ टक्के दुसऱ्या वेळच्या किंवा सीरिअल संस्थापकांच्या होत्या.

Post a Comment

0 Comments