पुन्हा तरुण वर्ग मनसेकडे आकर्षित...मनसेत कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश..


डोंबिवली ( शंकर जाधव ) प्रत्येक पक्षात कार्यकर्ता हा महत्वाचा  मानला जातो.,निवडणूका, जाहीर सभा, प्रचार सभा , नागरिकांशी संपर्क अश्या अनेक कामांसाठी कार्यकर्ता पुढे असतो.कार्यकर्ता खंबीर असला कि पक्ष सत्तेत असो को नसो पक्षाचे काम सुरूच असते.मनसेला पालिकेच्या सत्तेत सहभागी होता आले नसले तरी पक्षाचे काम कार्यकर्त्यानी सुरूच ठेवले.


         राजकारणात प्रत्येक पक्षाने चढ-उतार पाहिला आहे, मात्र कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्षाने जनतेची मने जिंकली.मनसे पक्षाला इतर पक्षातील कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यास यश येत आल्याचे दिसते.विशेष म्हणजे मनसेचे एकमेव आमदार कल्याण ग्रामीण मतदार संघातून निवडून आले.त्यामुळे कल्याण- डोंबिवलीत मनसेने आपली पकड मजबूत ठेवली आहे.मनसे पक्षात पुन्हा तरुण वर्ग आकर्षित होत असल्याचे दिसते.


            डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात पार पडलेल्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यात इतर पक्षातील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी मनसे पक्षात जाहीर प्रवेश केला. मनसे मध्ये प्रवेश घेणारे एवढे उत्साही होते की कार्यकर्त्यानी ढोल ताश्यात  कार्यकर्ता मेळाव्यात सामील होऊन पक्ष प्रवेश केला. तर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र राज्य समाज माध्यम प्रसिद्ध प्रमुख ह्या पदावरती अजय घोरपडे व प्रवीण बोऱ्हाडे यांची निवड झाल्याबद्दल आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments