तुमच्या सेनेवरील आरोपांच्या क्लिप्स चौकांत लावू भाजपचा सेना उपजिल्हा प्रमुखांना इशारा


डोंबिवली ( शंकर जाधव ) आरोप-प्रत्यारोपांनंतर बॅनरबाजीवर उतरलेली हे शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा नवीन वाद सुरु होणार असल्याचे दिसते.शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यावर निशाणा साधत`तुमची सेनेवरील आरोपांच्या क्लिप्स चौकांत लावू` अस इशारा भाजपचे माजी नगरसेवक राहुल दामले यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.तर भाजपने सुचविलेली मंजूर कामे रद्द केल्याचे शिवसेनेने मोठ्या मनाने मान्य करावे असेही सांगण्यात आले.

   

        डोंबिवली भाजपा पूर्व मंडळ कार्यालयात शुक्रवारी माजी नगरसेवक राहुल दामले यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे,मुकुंद पेढणेकर, संदीप पुराणिकआदि उपस्थित होते.यावेळी दामले यांनी शिवसेनेवर टीका करत ज्या विकासकामांची उद्घाटने केली जात आहे ती फडणवीस सरकारमध्ये मंजूर झाल्याचे सांगितले.शहरतील बॅनरबाजी थांबवून विकास कामांवर लक्ष दिले पाहिजे. निवडणुकीत आरोप –प्रत्यारोप होतील. मात्र त्यानंतर पाच वर्ष शहराच्या विकासावर लक्ष देऊ असे दामले यांनी स्पष्ट केले.


  एमएमआरडीएचे अधिकारी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांवर थेट आरोप करत काल भाजपची सत्ता होती म्हणून ते आमच्या बाजूने होते, आज शिवसेनेची सत्ता होती म्हणून ते सेनेच्या बाजूने आहेत.हे अधिकारी दोन्ही पक्षातील वाद पेटवण्याचे काम करत आहेत असे दामले यांनी यावेळी सांगितले.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधी डोंबिवली शहरासाठी काय केले ते सांगावे.स्मार्ट सिटीतील निधी कुठे-कुठे वापरला जातोय याची माहिती पत्रकारांनी घ्यावी.किती टेंडर निघाले, किती टेंडर निघाले नाहीत, स्मार्ट सिटीतील निधी बँकेत ठेवून त्यावरील व्याजाचे नक्की होतेय काय याची माहिती घेतली पाहिजे. 


         कोणत्या अधिकाऱ्यांना स्मार्ट सिटीत अधिकारी म्हणून बसवले आहेत याबद्दल जनतेला का सांगितले जात नाही. असा प्रश्न दामले यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.त्यानंतर दामले यांनी थेट शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांना इशारा देत मनसेत असताना शिवसेना नेत्यांवरील काय काय आरोप केले त्या क्लिप शहरातील चौकाचौकात लावले जातील असे सांगितले.


 चौकट

 

        भाजपा सोडून शिवसेनेत प्रवेश करणारे भाजपावर आणि आमदार चव्हाण यांच्यावर टीका करत आहेत. हा प्रकार चुकीचा आहे असे सांगताना माजी नगरसेवक दामले यांनी आरोप करणाऱ्यांचे नाव मात्र पत्रकार परिषदेत सांगितले नाही.


  विधानसभा निवडणुकीत  डीपाॅझीट झालेल्यांनी आमदारांना आव्हान करू नये...


       कोणत्याही चॅनलवर आमच्या समोर लाईव्ह यावे आणि विकास कामांची माहिती द्यावी असे आव्हान युवा सेनेचे पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी विधानसभा निवडणुकीत डीपाॅझीट झालेल्यांनी आमदारांना आव्हान करू नये असे प्रतिउत्तर दिले.


 

लोकसभा निवडणुकीत युतीत आम्हीही होतो हे खासदारांनी विसरू नये

   लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीत कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले होते हे  खासदार डॉ,श्रीकांत शिंदे यांनी विसरू नये. त्यामुळे शहराच्या विकास कामात भाजपने खासदारांकडे मागणी केली तर त्यात चुकीचे काहीही नाही असे दामले यांनी यावेळी सांगितले.Post a Comment

0 Comments