भिवंडीत सार्वजनिक शौचालय सेप्टीक टॅंक स्फोट, दुर्घटनेत एक ठार दोन जखमी


भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता च्या सुमारास चव्हाण कॉलनी येथील एका सार्वजनिक शौचालयाची सेप्टीक टॅंक मध्ये स्फोट होऊन त्यामध्ये एका वृद्धाचा दुर्देवी मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहे.सदरचे शौचालयचे महानगरपालिके कडून चव्हाण कॉलनी येथे सुमारे 15 वर्षां पूर्वी सदरचे सार्वजनिक शौचालय उभारले असून ते खाजगी ठेकेदार मार्फत परीचालना साठी दिले .


         असून त्या ठिकाणी योग्य ती काळजी न घेतल्याने सेफ्टीक टॅंक स्वच्छता न राखल्याने शौचालयात काही नागरीक शौचास गेले असता तेथील शौचकूपा खालील टॅंक मध्ये स्फोट झाल्याने तेथे शौचास बसलेले टोघे जण टाकीत पडले त्यामध्ये 70 वर्षीय इब्राहिम शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जखमी व्यक्तींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .


          या  दुर्घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पालिका आपत्कालीन कक्षास दिली असता भिवंडी महापालिका आपत्कालीन विभाग व अग्निशमन दल जवान व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांना मदत कार्य केले.

Post a Comment

0 Comments